आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त नाथश्री फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम
उप संपादक | प्रणित काठोके
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने नाथश्री फाउंडेशनच्या वतीने चांगदेव परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, शनि पार्क, मराठवाडा पटांगण, कोळीवाडा पटांगण तसेच स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेवचे चेअरमन अंकुश चौधरी, आदर्श इंग्लिश स्कूल, मुक्ताईनगरचे चेअरमन रविंद्र चौधरी, राजश्री शाहू मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी, मुक्ताईनगर शाखेचे व्यवस्थापक सागर शेळके, सामाजिक कार्यकर्ते गजानन चौधरी, नाथश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर इंगळे, देवेंद्र काटे, भागवत पाटील, राजेंद्र सुरूपाटणे, मंगेश भुसारी, रुपेश सोनवणे, दीपक तारू, लोकेश सुरूपाटणे, सौरभ महाजन, आदेश इंगळे तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा चौधरी, शिक्षिका जयश्री भगत आणि आरती इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाही वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा
कार्यक्रमात नाथश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना, वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. झाडे केवळ लावणे नव्हे, तर ती जगविणे हीदेखील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना दिला.
पर्यावरण जनजागृतीचे संदेश :
झाडे लावा, जीवन वाचवा.
एक तरी झाड लावूया, प्रदूषण दूर पळवूया.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे.
झाडे लावा, सृष्टी सजवा.
झाडे लावूया, वसुंधरेला हिरवेगार करूया.








