वाकड येथील भूमकर चौकात ‘स्वामी CNG हायड्रो टेस्टिंग प्लांट’चे उद्घाटन; पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण
वाकड, प्रतिनिधी : वाकड येथील भूमकर चौक येथे स्वामी CNG हायड्रो टेस्टिंग प्लांटचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्घाटनानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नवीन व्यवसायाच्या शुभारंभासोबतच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
वृक्षारोपण कार्यक्रमास अक्षय शहरकर, केनिथ रेमी, अमर नाणेकर, ॲड. किरण खाजेकर, मिलिंद फडतरे, इंद्रजीत गोरे, अनिल कदम, महालिंग स्वामी, हर्षल ठोंबरे, राधे, वाकडकर साहेब, अल्ताफ शेख, अमित देवकर, मधुकर यादव, मयूर यादव, गौरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून नव्या प्लांटच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ‘विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मधुकर यादव यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानले.








