आज जिल्हा परिषद शाळा उघडल्या, पडक्या जीर्ण झालेल्या शाळेसमोर नव्या कोऱ्या गाडीमधून सुटा बुटातून शहरातून आलेल्या गुरुजींकडे पाहत होतो.
प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ
*वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची शाळा व गुरुजी दोघेही दरिद्री होते.दीडशे रुपये पगार असल्यामुळे गुरुजी गावातच राहत होते. याच कौलाच्या शाळेत गावात राहणाऱ्या गुरुजी ने या देशाला मोठमोठी हिरे दिले! बापा पेक्षा गुरुजीचा दरारा घरात आणि गावात जास्त होता. देवापेक्षा गुरुजीला थोडा जास्तच सन्मान होता हळूहळू गुरुजीच दारिद्र्य संपलं! गुरुजी शहरात राहायला गेले व नोकरीसाठी गावात अपडाऊन करू लागले,पण शाळेचा दारिद्र्य तसंच राहिलं!*
*17000 शाळा बंद पडल्या म्हणजे 34 हजार भावी शिक्षक घरीच बसले.रिटायर झालेले शिक्षक शिकवणारे शिक्षक याच्यावर व्यक्त सुद्धा होत नाही.जिल्हा परिषदेच्या 17000 शाळेचा प्लॅन मर्डर झाला खाजगी शाळा जगवण्यासाठी त्याच पाप कसे फेडणार..?*
*आज जीर्ण झालेल्या शाळेला फुगे लावून गुलाब पुष्प देऊन मुलांची रॅली काढून जिल्हा परिषद च्या शाळेला ऍडमिशन घ्या असा उपक्रम घ्यावा लागतो, दारिद्र्यात असलेला बाप खर्च झेपत नसताना तो खाजगी शाळेत पाठवतो त्याला वाटते माझं दारिद्र्य माझ्या पोराच्या नशिबात येऊ नये पण त्याचा खाजगी शाळा खिसा कापत असताना या शिक्षण पॉकेट माराला तुम्ही मदत केली म्हणून आज अशी अवस्था आली, तुमच्या पगारातला एक टक्का तरी हिस्सा तुमच्या शाळेवर खर्च करा सरकारची वाट पाहू नका! गावातून वर्गणी गोळा करा! आहे ती शाळा वाचवा कारण तुमची गाडी घर याच्यावर चालते. आहे त्या शाळा आणि ते गुरुजी उरलेल्या शाळा जरी वाचू शकले तरी भरपूर आहे. रिटायर झालेल्या शिक्षक घरी बसून पेपर वाचत बसण्यापेक्षा रोज आपल्या जवळच्या शाळेत थोडा वेळ द्या किमान गरीबाच्या पोरासाठी आहे त्या शाळा वाचू शकतील…!*








