जळगांवत साखरपुडा झाला तरी रवींद्र चं जुनं प्रेम सुटेना; रवींद्रची लॉजवर आत्महत्या; पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल!
जळगांव जिल्हा उप संपादक प्रणित काठोके
सध्याच्या नव्या युगात एखाद्या व्यक्तीवर मनापासून आणि हृदयापासून जर प्रेम संबंध असेल तर हे नातं काही झालं तरी सुटत नाही, असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही… आणि याच प्रेमावरून जळगांव जिल्ह्यांतून मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. एका रेडीमेड कापड व्यावसायिक तरुणाची लॉजवर गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. रवींद्र संजय मोरे (वय 25) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो भडगांव तालुक्यांतील गिरडचा रहिवासी होता. पाचोर्यात त्याची रेडीमेड कपड्याची दुकाने होती. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रवींद्रचा नुकताच साखरपुडा झाला होता, आणि त्यात त्याचे लग्न ठरले होते, मात्र लग्नाला अवघे 45 दिवस उरले होते. मात्र रवींद्र जुन्या प्रेमासाठी ताण तणावाखाली होता. रवींद्रचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध होते. मात्र हे प्रेम संबंध काय सुटत नसल्याने त्याने (28 मे.) रोजी पाचोरा गोराडखेडे रोडवरील एका लॉजवर हे दोघेही गेले होते. यावेळी पंख्याला गळफास घेवुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीच्या गळ्यातील दोरी तुटल्याने ती खाली कोसळली आणि सदैव आणि तिचा जीव वाचला. घाबरलेल्या मुलीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली दरम्यान रवींद्र च्या कुटुंबियांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.*








