एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट खत निर्मिती

सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट खत निर्मिती; पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक शेतीचा दिला प्रभावशाली संदेश
श्री. मनोज उराडे गडचिरोली प्रतिनिधी : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात येत असताना, गडचिरोली जिल्ह्यातील केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल उचलत “कचऱ्यातून खत” निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. READY (Rural Entrepreneurship Awareness Development Yojana) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करून पर्यावरण संरक्षणासोबतच नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनी रुतू गुरनुले, आचल जुवारे, मधुरा कन्नमवार आणि अनुष्का कनपर्तीवार यांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्यक्ष कृतीतून “स्वच्छता, पुनर्वापर आणि शाश्वत शेती”चा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांनी भाजीपाल्याचा उरलेला कचरा, सुकलेली पाने, गवत तसेच इतर जैविक पदार्थांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने कंपोस्ट खत तयार केले. विशेष म्हणजे, सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून “कचरा ही समस्या नसून संसाधन आहे” हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांनी समाजासमोर ठेवला. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय शेती स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कंपोस्ट खताचे फायदे, जमिनीची सुपीकता वाढविण्यातील भूमिका आणि पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम READY कार्यक्रमाचे प्रभारी प्रा. के. डी. गहाने, सह-प्रभारी प्रा. एम. ए. लिल्हारे, समन्वयक प्रा. पि. डी. भांडेकर आणि कोर्स शिक्षक प्रा. एस. एस. सरदारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या काळात वाढते प्रदूषण, सेंद्रिय कचऱ्याची समस्या आणि रासायनिक शेतीमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम केवळ शैक्षणिक न राहता सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा ठरत आहे. “सेंद्रिय शेती हीच भविष्यातील खरी समृद्धी” हा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link