दिनांक 21/03/2026
वारोळा माजलगांव येथे राहत्या घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU)) व पोलीस ठाणे माजलगांव ग्रामीण ची संयुक्त कारवाई
दोन पीडित महिलांची सुटका
प्रतिनिधी संगीता ईनकर
याविषयी सविस्तर बातमी अशी की. अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना दिनांक २०.०३.२०२६ रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण हद्दीत वारोळा गाव येथे बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून, वैश्या व्यवसाय करीत आहेत ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी परी सहायक पोलीस अधीक्षक राहुलकुमार, प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण व पोउपनि पत्लवी जाधव गांना AHTU टीमसह सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून पोस्टे माजलगांव ग्रामीण चे प्रभारी अधिकारी राहुलकुमार व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व दोन शासकीय पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या महिला एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता, तिने तिचे अलका हडागाळे रा. वारोळा ता माजलगांव जि बीड असे सांगितले सदर महिलेची पंचासमक्ष झडती घेतली असता, उमी ग्राहकाने दिलेली नमूद वर्णनाची ५०० रू दराची एक नोट मिळून आल्याने ती पंचासमक्ष जप्त केली. सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या. त्यापैकी डमी ग्राहकासोचत रूम मधे मिळून आलेल्या पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता, तीने सांगितले की, ती परभणी ची असून, ची रामा गायकवाड रा. वारोळा ता. माजलगाव याने मला फोन करून इथे बोलवून घेतले आहे. तसेच दुसरी महिला छत्रपती संभाजीनगर पेचून आली आहे प्रत्येक ग्राहकाकडून ५०० रू घेतात व त्यापैकी आम्हाला ३०० रु देतात
एजेंट अलका हडागले व रामा गायकवाड दोघे रा. वारोळा ता माजलगांव जि बीड. है पीडीत महिलांना बोलवून घेतात व वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. तसेच रुमची झडती घेतली असता १२ विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. नमुद आरोपी हे पीडीत महिलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व त्याच कमाईवर स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैत्तिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३.४.५.६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलकुमार प्रभारी अधिकारी माजलगांव ग्रामीण पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव सहायक पोलीस उप निरीक्षक मीरा रेडेकर, महीला पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस हवालदार अशोक शिंदि, प्रदीप येवले, संजय राठोड, पोलीस शिपाई आकाश कारले, विकास वाघमारे, विठ्ठल चव्हाण, सर्व नेमणूक व अ. मा. वा. प्र. कक्ष व पोठा माजलगांव ग्रामीण यांनी केली








