एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगांव जिल्हा हादरला, पत्नीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याचा राग, प्रियकरांचा खून ! पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

पिपळगांव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा ता. पाचोरा गावातील खबर देणार नामें संजय भिमा राठोड 33 वर्ष व्यवसाय मजुरी रा बरसाडे तांडा नं 3 ता पाचोरा यांनी खबर दिली की, दिनांक २४/०२/२०२६ रोजी २३.३० ते दिनांक २५/०२/२०२६ रोजी ०४.०० वाजे दरम्यान खबर देणार यांचा भाऊ विजय भिमा राठोड, वय २५, रा. वरसाडे तांडा नं. ०३, ता. पाचोरा त्यांचा राहत्या घरुन कोणाला काहीएक न सांगता घरातून निघुन गेला त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही म्हणून त्यांनी दिलेल्या खबर वरुन पिपळगाव हरे पो. स्टे ला मिसिंग रजि नं 15/2026 दि.26/02/2026 रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती.

फिर्यादी यांनी दिलेल्या मिसींग तक्रारीवरुन पोलीसानी मिसींग मधील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले करुन सपोनि कल्याणी वर्मा व टिमने संशयीत व्यक्ती १) संजय परशुराम जाधव याचेकडे चौकशी केली असता आरोपी सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबुली दिल्यावरुन आरोपी संजय परशुराम जाधव यांची पत्नी सोनाली संजय जाधव हिचे व मयत विजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधातून मयत विजय राठोड याने सोनाली संजय जाधव हिचे त्याचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडोओ काढून तो तिस धमकावत होता. सदरबाबत मला माहिती मिळाल्याने आरोपी संजय परशुराम जाधव व त्याची पत्नी सोनालीन यावी विजय राठोड यास जिवे ठार मारुन त्याच्या प्रेताची व्हिल्हेवाट लावली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यावरुन सदर गुन्हयातील दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली असून, मा. न्यायालय, पाचोरा यांनी यातील अटक आरोपीतांना ०५ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून, सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कल्याणी वर्मा हे करित आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link