एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कबुतरांच्या वादातुन घडलेल्या खुनाचा लावला छडा ४ आरोपींच्या गुन्हे शाखा पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

कबुतरांच्या वादातुन घडलेल्या खुनाचा लावला छडा ४ आरोपींच्या
गुन्हे शाखा पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

कबुतरांच्या वादातुन घडलेल्या खुनाचा लावला छडा ०४ आरोपीतांना केली अटक

प्रतिनिधी कांताभाऊ राठोड

दिनांक १८/०३/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक ०२ कडील अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पवार इन्क्लेव्ह सोसायटी शंकरमठ हडपसर पुणे या समोर असलेल्या मोकळ्या जागेत कबुतराची ढाबळ असुन पहाटेच्या सुमारास काही इसम हे कबुतराच्या ढाबळीजवळ उभे असल्याचे दिसल्याने त्यातील एक तरुणास इसमाला संशयावरुन ०५ लोकांनी लाकडी बॅटने तसेच लाथा बुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केलेले आहे. त्यास उलटी होवु लागल्याने वरील ०५ इसमापैकी दोघांनी त्यास अपघाताचा बनाव करुन त्यास अॅब्युलन्स मधुन ससुन हॉस्पीटल पुणे येथे घेवुन चाललेले आहे.

सदरची बातमी पोनि राम राजमाने खंडणी विरोधी पथक ०२ यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन पोलीस अंमलदार राउत व रोकडे यांना तात्काळ ससुन हॉस्पीटल येथे जावुन वरील घटनेच्या अनुषंगाने चौकशी करण्यास सांगीतली. पोलीस अंमलदार राउत व रोकडे यांनी ससुन हॉस्पीटल येथे जावुन ४० नंबर वार्ड मध्ये चौकशी केली असता त्यांना संशयीत दोन इसम मिळुन आले. त्यांनी अॅब्युलस मधील आणलेला तरुण हा मयत झालेला होता. त्यांचेकडे सखोल व कसुन चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की आमच्या घरासमोर आमची एक कबुतराची ढाबळ आहे. त्या ढाबळीजवळ हा मयत इसम संशयास्पद उभा होता. कबुतरे चोरण्यासाठी हा इसम आला असावा असा आम्हास वाटल्याने आम्ही घरातील ०४ भावांनी व आमचा एक मित्र असे ५ जणांनी मिळून त्यास लाकडी बॅटने तसेच लाथा बुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. नंतर त्यास कबुतराचे ढाबळीस बांधुन ठेवले. सकाळी पहाटे ०६ वाजण्याच्या सुमारास तो घाबरल्यासारखे करु लागल्याने त्यास ससुन हॉस्पीटल येथे घेवुन आलो आहे. परंतु तो हॉस्पीटलमध्ये आणण्याच्या अगोदरच मयत झाला आहे.

नंतर त्यांचे राहते घरी जावुन त्याचे इतर मारहान करणारे भाऊ यांना ताब्यात घेवुन चौकशी करता त्यांनी देखील वरीलप्रमाणे हकीकत सांगीतली. त्यांनतर वानवडी पोलीस स्टेशन येथे फोन करुन घडलेल्या घटनेबाबत माहीती घेतली असता त्यांनी सांगीतले की खंडणी विरोधी पथक ०२ च्या ताब्यातील ०४ भावांनी कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन एका इसमास गंभीर जखमी करुन खुन केलेला आहे असे उघडकीस आलेने त्याप्रमाणे वानवडी पो.स्टे. येथे गुन्हा रजि नंबर ९५/२०२२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३ (१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील आरोपी नामे १) गौरव विजयकुमार माजी वय २२ रा.शंकर मठ पावर सोसायटी वैदवाडी हडपसर पुणे. २) सचिन विजयकुमार माजी २३ रा. सदर ३) मोनु विजयकुमार माजी वय २६ रा. सदर ४) बंटी विजयकुमार माजी वय १८ रा. सदर यांना वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, व पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रविंद्र रोकडे, अमोल राऊत, यांनी केलेली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link