स्नेहबंध फौंडेशनतर्फे” जिल्हास्तरीय किल्ले बनवण्याची स्पर्धा २०२५.
प्रतिनिधी सारंग महाजन.
अहिल्यानगर – दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली.
दिवाळीत लहान मुले एकत्र येऊन विविध किल्ले साकारतात. लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह २३ ऑक्टोबर पर्यंत ८७९३ १९१९१९ या क्रमांकावर मोबाईलवर काढलेला अर्ध्या मिनिटाचा व्हीडिओ व २ ते ३ फोटो पाठवावे.(जुना व्हिडिओ व फोटो चालणार नाही.) किल्ला दगडमातीचा असावा, पण सजावटीकरता अन्य वस्तू व रंग वापरता येतील. इकोफ्रेंडली किल्ला असल्यास त्यालाही विशेष गुण दिले जाणार आहेत. स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन स्पर्धकांना मान्यवरांचा उपस्थितीत दिवाळी झाल्यानंतर गौरवण्यात येणार आहे. मागील विजेत्या स्पर्धकांना प्रवेश मिळणार नाही. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.










