एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शेतामध्ये गांजाची लागवड करणाऱ्यांवर लोहगांव पोलिसांची धडक कारवाई ; पोलीस निरीक्षक मनिषा पाटील

गांजाच्या मुळावर घाव, लागवड करणा-या इसमावर पोलीसांची कारवाई

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

लोहगांव पोलीस ठाणे, पुणे शहर येथील पोलीस अंमलदार आकाश मोरे व अमोल आदलिंग यांना त्यांचे गोपणीय खबरी मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पठारे वस्ती, लोहगांव येथे एक इसम गांजाची लागवड करुन उत्पादन करुन विक्री करत आहे. सदरची बातमी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांना सांगीतली, त्यांनी सदर माहीतीचे अनुषंगाने लोहगांव पोलीस ठाणेचे पथक घेऊन बातमीचे ठिकाणी दिनांक २७/०४/२०२६ रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे हर्ष भरतकुमार पांचाल, वय ३० वर्षे, सध्या रा. बी-४०१, नमो पॅराडाईज, लेननं १, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे मुळ अहमदाबाद, गुजरात हा भाडयाने घेतलेल्या बंगल्याचे गार्डनमध्ये लहान मोठे ४१ गांजाची झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले.

सदरची गांजाच्या झाडांचे वजन ४.३२८ किलो ग्रॅग तसेच तो वापरत असलेल्या हुडांई कंपनीचे चारचाकी गाडीत ०.०६६ किलो ग्रॅम गांजा मिळून आला असुन एकुण ०९ मोबाईल फोन मिळुन आले. सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्या मध्ये एकुण ६,०७,३८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन आरोपी नामे हर्ष भरत कुमार पांचाल, वय ३० वर्षे, रा. बी-४०१, नमो पॅराडाईज, लेननं १, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे यांचेवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात चालु आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि ०७ श्री. सोमय मुंडे, मा.सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मनीषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम, सचिन जाधव, आकाश मोरे, ज्ञानेश्वर आवारी, युवराज चौधरी, अशोक थोरात यांचे पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link