युवा ग्रामीण पत्रकार संघ मुंबई कार्याध्यक्षपदी विकास वायाळ यांची नियुक्ती
प्रतिनिधी प्रमुख मुंबई किशोर गुडेकर
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश कचकलवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान – पत्रकारिता आणि चित्रपटसृष्टीतील कार्याची दखल
सुप्रसिद्ध अभिनेते, रायटर, दिग्दर्शक तसेच सहकलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ चे मानकरी श्री विकास वायाळ यांची नुकतीच ‘युवा ग्रामीण पत्रकार संघ’ या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश आर. कचकलवार यांच्या हस्ते देण्यात आली. संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री वायाळ यांची निवड करण्यात आली आहे.
सध्या श्री वायाळ हे ‘दैनिक युवक आधार’ या वृत्तपत्राचे मुंबई प्रतिनिधी पत्रकार म्हणूनही कार्यरत आहेत तसेच दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष आहेत.
पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल विविध पत्रकार संघटना, कलावंत मंडळी आणि चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
“पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आवाज प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार,” असे श्री वायाळ यांनी या प्रसंगी सांगितले.








