नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे राज्यभरांतून कौतुकाचा वर्षाव..!!
कलावती गवळी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या जिल्हाधिकारी डॉ . मिताली सेठी यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल करीत सर्वांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. दरम्यान मुलांना शाळेत सोडायला जातानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या तुफान सोशल मीडियावर देखील वायरल झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी पुढे म्हणाल्या… आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हेच मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. यामुळेच पालकांची खाजगी शाळांकडे जास्त ओढ पाहायला मिळतेय, पण शिक्षणाची खरी ताकद केवळ महागड्या फी. किंवा एसी क्लाससरूममध्ये नसून शिक्षकांची निष्ठा समाजाचा सहभाग आणि शिकवण्याची जिद्द यात दडलेली आहे. सध्या आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची चांगलीच धडपड दिसून येते. त्याकरिता इंग्रजी शाळेत पाल्यांना शिकवण्यासाठी पालक देखील लाखों रुपये खर्च करण्यास तयार असतात. त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र नंदुरबारच्या डॉ . मिताली सेठी जिल्हाधिकारी यांनी एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांचा प्रवेश शहरांतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत केला आहे. मुलांच्या प्रवेशासाठी त्या स्वतः शाळेत गेल्या त्यावेळी त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. आणि त्यांच्यावर सध्या संपूर्ण राज्यभरांतून कौतुकचा वर्षाव होत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी आपल्या तीन वर्षाच्या सबर आणि शुकर या जुळ्या मुलांना टोकरतलाव, येथील अंगणवाडीत दाखल केले आहे. या अंगणवाडीतील सेवा आणि शिक्षिकांचे विद्यार्थी प्रती असलेले प्रेम पाहून जिल्हाधिकारी देखील प्रभावित झाल्या होत्या. सरकारी शाळांबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण व्हावा: आणि शिक्षण क्षेत्रात चांगलेच बदल घडावेत या उद्देशानेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे इतर पालकांसाठी एक चांगलाच आदर्श ठरला आहे.








