अडावद येथील नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक समाधान पाटील
चोपडा तालुक्याती अडावद येथे नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री पी डी चौधरी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला श्री पी.डी .चौधरी सर ,इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सेंड्रा मॅडम, उपप्राचार्य प्रकाश राणे सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .त्यानंतर विद्यालयातील लहान लहान बाल गोपालांनी उपस्थित सर्वच शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक गुरु पूजन केले. श्री पी डी चौधरी सर, सेंड्रा मॅडम, राणे सर सर तसेच उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची कामना केली.
सदर प्रसंगी श्री पी डी चौधरी सरांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व आपल्या मनोगतातून विषद केले.
” गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवेय नम:”
‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.
गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला.गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंबद्दल आदराची भावना आपल्या हृदयात जपावी असा मौलिक सल्ला श्री पी डी चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.








