एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पत्रकार गणेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

पत्रकार गणेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! शिंदवणे घाटातील अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई; दोन हायवा जप्त, शासन तिजोरीत ₹4.86 लाखांचा दंड जमा
लोणी काळभोर (प्रतिनिधी):
सारोळे–वाघापूर–यवत रोड तसेच शिंदवणे घाट परिसरात सुरू असलेल्या अवैध ओव्हरलोड व बेकायदेशीर गौण खनिज (मुरूम/वाळू) वाहतुकीबाबत पत्रकार तथा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज 24 चे सहसंपादक गणेश महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, लोणी काळभोर कार्यालयाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, पत्रकार गणेश महाडिक यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय (खनिकर्म शाखा) तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली.
मंडल अधिकारी उरुळी कांचन यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या पथकाने कारवाई करून अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक पकडले.

या दोन्ही वाहनांवर महाराष्ट्र गौण खनिज नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ₹४,८६,८७५ इतका दंड वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे, अशी माहिती अपर तहसीलदारांनी आपल्या पत्राद्वारे दिली आहे.
या कारवाईमुळे शिंदवणे घाट परिसरातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केल्याचे स्पष्ट झाले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पत्रकार गणेश महाडिक यांनीही परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि शासनाच्या महसुलाची होणारी हानी रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सातत्याने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link