भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ०८ बांगलादेशी महिलांना, बुधवार पेठ रेड लाईट एरिया मधील छापाकारवाई मध्ये पकडण्यात फरासखाना पोलीसांना आले यश.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :मा. पोलीस आयुक्त. पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला / पुरुष यांचा शोध घेवुन त्यांच्या वर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे, यांच्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने तपास पथक तसेच ए.टी.सी. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना फराखाना पोलीस स्टेशन हद्दी मधील बुधवार पेठ पुणे येथील रेड लाईट एरिया मधील आशा बिल्डींग, ढमढेरे गल्ली, बुधवार पेठ येथे अवैद्यरित्या बांगलादेशी महिला/पुरुष असल्या बाबत माहिती प्राप्त झाली होती.
त्या माहितीच्या अनुषांगाने सदर भागात शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देवुन, दि.०२जुलै २०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोनि (गुन्हे), श्री. अजित जाचव, सपोनि वैभव गायकवाड, म.स.पो.नि. शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, सपोफौज मोकाशी, व स्टाफ यांच्या सह दोन पथके तयार करुन, आशा बिल्डींग, ढमढेरेगल्ली, बुधवारपेठ पुणे येथील रेड लाईट एरीया मध्ये अचानक छापा टाकुन एकुण ८ बांगलादेशी महिला मिळुन आल्या, त्यांना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता, त्या अवैद्यरित्या विनापरवाना भारतात येवुन, स्वखुशीने वेश्या व्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यांना ताब्यात घेवुन त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे गोळा करुन, त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांची नावे १) अंजुरा बेगम कामरुलचौधरी वय ४० वर्षे रा. ग्राम-कालीया जिल्हा-जोशोर, थाना नरैल, बांगलादेश २) खदीजा वेगम महाबुर शेख वय २७ वर्षे रा. ग्राम बागेरपारा, जिल्हा जोशोर, थाना मणिरामपुर, पोस्ट चंदीपुर, बांगलादेश ३) पारोल वेगम मिठु शेख वय ३८ वर्षे रा. ग्राम-परहरजी, फोल्या पोस्ट मोकमपुर, जि. खुलना थाना तेरखाडा, देश-बांगलादेश ४) तंजीला बेगम आलमगीरकाझी वय ४० वर्षे रा. ग्राम-मधुपुर, कोला, पोस्ट- कोलापतगती थाना तेरखाडा, जिल्हाखुलना, बांगलादेश. ५) रुपाली वेगम अकवर शेख वय ३८ वर्षे रा. ग्राम हाजीग्राम, बाजार, जि. खुलना, थानादिघोलीया बांगलादेश. ६) मन्सुरा रफिकहवालदार अख्तर वय १९ वर्षे रा. बारीशाल पोस्ट पोतुला, जि. नारायणगंज राज्य ढाकादेश, बांगलादेश ७) सिमा आलमगीर शेख वय ४५ वर्षे रा. कुली बागण, पोस्ट-खुलना जिल्हा खुलना, देश बांगलादेश ८)रिनाखातून फोजरगाजी वय ३२ वर्षे रा. ग्राम रुखाली थाना मिर्झापुरजिल्हा नरैल, बांगलादेश अशा मिळुन आलेल्या आहे.
सदरच्या महिला बांगलादेश येथुन, छुप्या पध्दतीने बॉर्डर पार करुन अवैद्यरित्या भारतात येत होत्या, त्यानंतर त्या पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुणे येथे रेड लाईट एरिया मध्ये स्वखुशीने वेश्या व्यवसाय करीत असल्याचे चौकशी दरम्यान निदर्शनास आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि.१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, श्री. उत्तम नामवाडे, स.पो.नि. वैभव गायकवाड, शितल जाधव, पो. उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पुनम पाटील, सपोफौ मेहबुब मोकाशी, खराडे, निढाळकर, शिंदे, पोलीस अमंलदार, तेलंगे, नांगरे, पासलकर, शिंदे, मपोहवा साबळे, शिंदे पाटील, करदास, पुकाळे, कांबळे पोलीस अमंलदार गजानन सोनुने, पवार, नितीन जाधव, खुट्टे, जाधव, फिराज शेख, पालांडे, जुबड, मपोशि, भालेराव, राऊत, चोरघडे, ढवळे, बनसोडे, जाधव महाडिक, ओव्हाळ, यांनी केलेली आहे.
