एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ
एरंडोल प्रतिनिधी स्वप्नील पाटील
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रा.हि जाजू प्राथमिक विद्या मंदीर,एरंडोल,या शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली,सर्व चिमुकले विद्यार्थी वारकर्यां च्या वेषात आले होते,शाळेच्या आवारातुन गावात दिंडी काढण्यात आली,
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसुन आला,दिंडीमधे गोल रिंगण करण्यात आले,चिमुकल्या विद्यार्थिनी बैठे फुगड्या सादर केल्या,दिंडीत काही शिक्षक बंधु भगिनीं देखील वारकरी वेषात आले होते,दिंडी यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.जयश्री कुलकर्णी,सर्व शिक्षक बंधु भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले,पालक वर्गाचे सहकार्य लाभले
