अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अण्णासाहेब जाधव यांनी गडहिंग्लज विभागांच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
तर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांची पदोन्नतीने बदली
सौ. कलावती गवळी ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी
राज्यांतील 82 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक दर्जेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील 2 पोलीस उपायुक्तांच्या तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांची देखील बदली झाली आहे, कोल्हापूर गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांची अंमली पदार्थ फोर्सचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे, गेल्या दोन वर्षापासून निकेश खाटमोडे-पाटील आरोपींवर चांगलाच वचक ठेवण्यात यशस्वी झाले होते, अतिशय शांत स्वभाव पद्धतीने काम करणारे निकेश खाटमोडे पाटील हे गडहिंग्लज विभागात अतिशय चांगल्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था हाताळला, जनतेशी देखील त्यांची नाळ जोडली गेली होती, इचलकरंजी शहरांमध्ये एक वेगळी ओळख अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आपली निर्माण केली होती, नव्याने आलेले अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी यापूर्वी सांगली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केल्यामुळे त्यांना या परिक्षेत्राचा चांगलाच अभ्यास आहे, सांगलीतून त्यांची पदोन्नतीने नाशिक येथे नागरिक संरक्षण हक्क विभागात नियुक्ती झाली होती, आता पुन्हा नव्याने गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला, यावेळी मावळते अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला
