नूतन अध्यक्ष छावणीच्या विकासासाठी भरीव योगदान देतील : डॉ. उद्धव शिंदे .
प्रतिनिधी- सारंग महाजन.
स्नेहबंध तर्फे नूतन छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी सुनील कुमार यांचे स्वागत
अहिल्यानगर – आपले या पदावर स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आपण या पदावर यशस्वीपणे कार्यभार सांभाळाल आणि छावणीच्या विकासासाठी भरीव योगदान द्याल, अशी आम्ही आशा करतो. असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
छावणी परिषदेचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर पी सुनील कुमार यांचा अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांनी रोपटे देऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे
उपस्थित होते. यावेळी डॉ. शिंदे यांनी ब्रिगेडियर पी सुनील कुमार यांना छावणी परिषद भिंगार मध्ये करत असलेल्या कार्याची माहिती देऊन छावणी परिषदेच्या कामाचे कौतुक केले.
