गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी – वारकरी, कष्टकरी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशनाचे निमित्य बैठक व चर्चासत्र
प्रतिनिधी ज्योत्स्ना करवाडे
शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क, व अधिकारासाठी शेतकरी- वारकरी, कष्टकरी महासंघाचे अधिवेशन घेण्यात ऑगस्टमध्ये घेण्यात येत आहे, त्यानिमित्ताने दास टेकडी गुरुकुंज (मोझरी) येथे 8 जुलै 2025 ला दुपारी 1.00 वाजता बैठक घेण्याचे ठरले.
विषय:-
१)केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या परिस्थितीचे झालेले अवमूल्यन तसेच मजुरांचे शोषण. (त्यावरील पुढील दृष्टिकोन, विश्लेषण, योग्य दिशा व उपाय योजना ).
२) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या( जी. प.व महानगर पालिका)निवडणुकी निमित्ताने राजकीय भूमिका ठरविणे.
३) शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ” स्वतंत्र कृषी न्यायालय ” व्हावे व शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी
” स्वतंत्र शेतकरी मंत्रालय ” व्हावे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जागतिक बाजारपेठ मुक्त होऊन आयात निर्यात धोरण, शेतकरी हिताचे राबवावे.
४) आमची सत्ता आल्यास,किमान महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही.? आम्ही किमान पाच वर्षात नियोजन करून त्या प्रकारे अनेक कार्यक्रम राबवून, आत्महत्या रोखणार,अशी सडेतोड ग्वाही, व हमी देऊ !.
५) संपूर्ण भारत देशातील व महाराष्ट्रातील ग्रामगीताचार्य व ग्रामगीता प्रचारकांचे भव्य शिबिर, व चर्चासत्र अधिवेशनात घेण्यात येईल.
६) शेतकरी- वारकरी, कष्टकरी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सर्वानुमते पुढील ऑगस्ट महिन्यात जय्यत तयारी करणे.
७) आत्महत्याग्रस्त महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी !
८) बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी !
९) शेतमजुरांच्या घरकुलांचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी ! १०) शहरी लोकांच्या निवारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी! ११) शेती व बँकेने जप्त केलेली घरे, व मालमत्तेच्या नोटीस आले असेल तर सामोरे जाणे व लिलाव थांबविणे .
१२) गावाला जोडणारे पांदण रस्त्याला भरघोस निधी देऊन, रस्ते अडचणीत आणलेल्या शेतकऱ्यांनी, त्यांचे प्रश्न विचारणार तर घेऊ त्वरित मार्गी लावणे, व गाव विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प सक्तीने पूर्ण करणे.
१३) गावातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्वरित मार्गी लावणे. खारपान पट्ट्याचा विकास करणे.
१४) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न त्वरित मार्गे लावणे.
१५) सामाजिक जनजागृती करणाऱ्या वारकऱ्यांना, व ग्रामगीता प्रचारक, तसेच आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यातील शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना मानधन व त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावने.
१६) जन सुरक्षा विधेयक मागे घेने. (लाचारी,गुलामी वाढवीण्यासाठी आणि लोकशाही खतम करण्यासाठी वापरण्यात आलेले हे शासकीय हत्यार आहे. त्वरीत मागे घ्यावे. )
१७) शेतकऱ्यांसाठी 24 तास शेतीच्या कामासाठी वीजपुरवठा सतत चालू ठेवावा.
१८) शेतकरी शेतमजुराचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पुढील वेतन वाढ थांबवावी. नाहीतर वेतन आयोगाचे महागाई प्रमाणे शेतकऱ्यांना शेतमालाची भाव वाढ द्यावी.
१९) चेहरे करण्यावरील खर्च कापून ठेवून ग्रामीण जीवनाचा विस्तार करण्यात यावा ग्रामीण व्यवस्थेवर शासन तिजोरीतील 50% रक्कम खर्च करण्यात यावी.
२०) शेती वाहत असताना वन्य प्राण्यांचा वाढत असले ल्या हैदोसाला आळा घालण्यासाठी, त्वरित वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती वाहने कठीण झाले आहे.
” सहभागी व्हा!, स्वतंत्र व्हा ! ”
स्थळ :- राष्ट्रसंत आध्यात्म केंद्र, दास टेकडी. गुरुकुंज. मोझरी. जिल्हा. अमरावती.
सामाजिक , राजकीय व आर्थिक स्वातंत्र्यासाठी, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी, खालील सामाजिक संघटना, लोकहितकारक मंडळी, एकत्र येत आहेत. या स्वातंत्र्यप्रिय आंदोलनात आपणही सामील होऊ शकता ?
खालील चळवळीला योगदान व सहकार्य:-
१) ॲड. वसंतरावजी ढोके, यवतमाळ ( शेतकरी नेते, राजकीय विश्लेषक व सामाजिक आश्रय दाते)
२) किसान ब्रिगेड महाराष्ट्र , — श्री प्रकाशभाऊ पोहरे. संपादक दै.देशोन्नती,अकोला.
३)क्रांती ज्योती ब्रिगेड,– श्री नंदेश भाऊ अंबाडकर.
४) सीता मंदिर ट्रस्ट, — बाळासाहेब देशमुख.रावेरी.
५) संयुक्त रिपब्लिकन पार्टी — एड.पी. एस. खडसे.
६) विदर्भ कुरेशी समाज –सादिक भाई कुरेशी, अम.
७) श्री गुरुदेव सेवा संस्था.–
एड.अशोकराव यावले ,नागपूर.
८) विदर्भ आंदोलन आघाडी —
श्री राजीव कुमार म्हैसबडवे नागपूर.
९) महाराष्ट्र जनजागृती मंच-श्री शिवराम पाटील,जळगाव
१०) छत्रपती शिवराय शेतकरी आघाडी —
श्री दिलीपजी गायकवाड. सांगली.
११) शेतकरी समन्वय समिती .नाशिक — श्री भगवान बोराडे. श्री कैलास बोरसे, श्री दिलीप पाटील बच्छाव.
१२) शेतकरी नेते श्री आप्पासाहेब कदम जालना, श्री काकासाहेब साबळे भोकरदन.
१३) शेतकरी संघर्ष समिती –
श्री सुधाकर मोगल,श्री नानासाहेब बच्छाव,नाशिक.
१४) राष्ट्रीय जनता पार्टी.–
श्री सुमित्राजी नंदन साहेब, मुंबई.
१५) सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी,–
श्री भाऊराव वानखडे अकोला,जितुभाऊ खान.
१६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- मिलिंद तायडे
१७) वारकरी संप्रदायिक मंडळ, पंढरपूर. देहू,आळंदी. श्री प्रभाकर फुलसुंदर महाराज (- नारायणगाव पुणे.), संभाजी गुणाट महाराज देहू, भगवान महाराज जाधव देहू. बाळासाहेब रास्ते.
१८)ज्येष्ठसमाज सेवक श्री जनार्दन पाटील मगर.,श्री हरिभाऊ दादा वेरूळकर ,श्री प्रल्हाददादा.पारीसे,श्री रुपरावजी वाघ.,श्री ज्ञानेश्वर दादा रक्षक, श्री रवी भाऊ मानव,व विश्वबंधु महाराज राजपूत , प्रकाशराव कदम वर्धा व इतर( ग्रामगीताचार्य आणि ग्रामगीता प्रचारकांनी जरूर उपस्थित रहावे.)
१९) किसान क्रांती संघटना निफाड नाशिक, —
इंजिनीयर शंकर दरेकर साई फार्मर प्रोडूसर कंपनी.
२०) जय जवान पार्टी – रुपेश बोंडे साहेब सेलू..
२१) आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला आघाडी.–
श्रीमती विजयाताई वाढणकर, श्रीमती माधुरीताई चेटूले, श्रीमती बेबीताई वाघ ,श्रीमती जयश्री बोंडे, व इतर एकल महिला..
२२) सरपंच संघटना. महाराष्ट्र —
श्री गजानन भाऊ बोंडे. अमरावती.
२३) युवा ग्रामीण पत्रकार संघ..
अध्यक्ष- श्रीमती.जोसनाताई कुरवाडे.
२४) शिवप्रतिष्ठान प्रचारक…
श्री जनार्दन पाटील धुळे,( ह. मु. दिल्ली.)
२५) बेरोजगार युवक संघर्ष समिती –
श्री माधव जांबकर , माधुरीताई गावंडे पुणे.
२६) क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड –
श्री शिवाजी नाना नांदखिले दौंड.
२७) समाजवादी जनता संघर्ष पार्टी.—
श्री मधुकरजी थाटे पुणे.
२८) रिमेक्स इलेक्ट्रिकल कंपनी ,पुणे,
वाशिम येथील उद्योजक श्री अविनाशजी जोगदंड साहेब. तसेच वाशिम येथील प्रतिष्ठित बांधकाम व्यवसाय श्री देवेंद्र खडसे साहेब.
२९) आदिवासी संघर्ष समिती नंदुरबार धुळे ,–
श्री किशोर भाऊ ढमाले (पुणे)
३०) झिरो पॉईंट प्रतिष्ठान, मोर्शी.—
श्री संजय भाऊ कोल्हे (शेतकरी नेते)
३१) सामाजिक रुग्णसेवा चळवळ . – डॉ.रमेशजी ढवळे साहेब, माजी डीन नाशिक.(आस्टोलि, ह. मु. नागपूर. )
३२) शेतकरी – शेतमजूर चळवळ – श्री अनंत कुमार पाटील,पोहरा देवी, श्री मनीष जाधव पुसद, श्री गोपाल भाऊ भालेराव , व प्रवीणभाऊ कावरे. बोराळा , दर्यापूर. ॲड.जाधव ऑडिटर साहेब, दर्यापूर.
३३) महिला संघर्ष समिती
अध्यक्ष- श्रीमती प्रीतीताई दीडमुठे, साठगाव चंद्रपूर., डॉ. सरिताताई पाटील,जळगाव,धुळे. श्रीमती जानकी ताई सातपुते कुर्ला मुंबई,श्रीमती महानंदाताई गावडे बदलापूर ठाणे. सारिका तीमांडे,चंदाताई तिमांडे , विद्याताई तीमांडे ,मुक्ताई चांभारे, वर्षाताई जवादे ,विद्याताई वाघमारे, मनीषा तीमांडे. डॉक्टर रेखाताई निमजे, अलकाताई डहाके, सरिताताई इंगोले, प्रणिताताई चौधरी. पद्माताई चव्हाण,सातारा, ह.मु. हैदराबाद , सीमाताई टाले अमरावती. दीपक कथे ,बाळासाहेब आंबेडकर , रंगराव भाऊ लांबटकर चांदूरबाजार.इत्यादी
३४) डॉ.श्री सचिन पावडे वर्धा , श्री सोमराज भाऊ तेलखडे कारंजा घाडगे, अरुणभाऊ वऱ्हाडे नागपूर. इत्यादी..
बैठकीमध्ये शेतकरी, वारकरी- कष्टकरी, महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार असून व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व विदर्भातून दिंडी यात्राचे सुध्दा आयोजन करण्यासाठी एकत्र बैठक घेण्यात येत आहे. तसेच भारत या कृषिप्रधान देशात लेबर कोर्ट आहे ,फॅमिली कोर्ट आहे, औद्योगिक कोर्ट आहे, फौजदारी न्यायालय आहेत, सर्व शेतीवरील न्यायनिवाळे दिवाणी न्यायालयात का घातले आहेत, मग शेतकऱ्यांच्या व शेतीतील न्यायनिवाळे निपटण्यासाठी “स्वतंत्र कृषी न्यायालय” (स्वतंत्र एग्रीकल्चर कोर्ट ) का झाले नाही ?, या देशात शेतीच्या न्यायासाठी बेरोजगार एम एस सी (कृषी )एल.एल.एम. मिळाले नाहीत का ? व शेतीतील पीक उत्पादकता वाढविण्यासाठी, शहरे पोसण्यासाठी, कृषी मंत्रालय झाले मग ,शेतीवर राबणारा, जगणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्याची स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी “स्वतंत्र शेतकरी मंत्रालय” का झाले नाही..
तरी या बैठकीला लेखक ,कवी , पत्रकार, साहित्यकार, तसेच गुरुदेव सेवकांनी आंबेडकर विचारवंतांनी, शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या रात्रंदिवस वारकरी संप्रदायांनी, व तसेच वेगवेगळे शेतकरी आंदोलनातील संघटनांनी, या स्वातंत्र्य प्रिय , सामाजिक व राजकीय लढ्यात सामील व्हावे.
(टीप:— गुरुकुंज मोझरी हे गाव अमरावती ते नागपूर हायवे वर आहे.)
३) समय का इंतजार करो, अभी तो खेल बाकी है l
ना हिंदू खतरे मे है l, ना मुस्लिम खतरे मे है l
आज तो सिर्फ, किसान और मजदूर खतरे मे है l
आयोजक-
धनंजय पाटील काकडे .9890368058.
राष्ट्रीय अध्यक्ष:- शेतकरी- वारकरी – कष्टकरी महासंघ. महाराष्ट्र.( ज्येष्ठ साहित्यिक व सरसेनापती शेतकरी आंदोलन समिती. महाराष्ट्र.).
सूचना:-
ज्या पत्रकार संपादक साहेबांनी ही वरील बातमी छापली नसेल, तर कृपया छापावी, ही विनंती
