एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

फत्तेपूर येथे महिलेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फत्तेपूर येथे महिलेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उप संपादक | प्रणित काठोके

फत्तेपूर पोलीस ठाण्यात महिलेवर कथित सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पीडित महिला रस्त्याने पायी जात असताना आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २ च्या मदतीने तिला जबरदस्तीने दोरीने बांधले. त्यानंतर वाहनातून जवळील ओढ्याजवळ (नाल्याजवळ) नेऊन आरोपींनी तिच्यावर कथित सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींपैकी एकाचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय असून, पीडितेच्या पतीकडे ट्रॅक्टर भाड्याचे सुमारे १ लाख रुपये थकीत असल्याची माहितीही तपासादरम्यान समोर आली आहे. या आर्थिक व्यवहाराचा घटनेशी काही संबंध आहे का, याचाही पोलीसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणात पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत असून, सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link