अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अमोल तांबे यांनी लातूर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ आता पुण्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर जिल्ह्यात प्रयत्नशील,
संभाजी पुरी गोसावी (लातूर जिल्हा ) प्रतिनिधी.
लातूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून प्रदेश विकास प्राधिकरण पुणेचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे अमोल तांबे यांची लातूरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, सोमवारी त्यांनी दुपारी पोलीस मुख्यालयात हजर राहून मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, तर लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती झाली आहे, मागील काही दिवसांपूर्वी जयंत मीना यांची लातूरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती मात्र आता त्यांची नियुक्ती रद्द होऊन अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांची धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर पोलीस अधीक्षक पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच प्रयत्नशील ठरले, लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील त्यांनी चांगलीच मोडीत काढली होती, 2016 मध्ये आयपीएस अधिकारी बनल्यानंतर त्यांनी वैजापूर येथे प्रोबेशन अधिकारी म्हणून करिअरला सुरुवात केली होती, अमरावती येथे अप्पर पोलीस अधीक्षक तर गडचिरोली ते नक्षलवादी विरोधी मोहिमांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती, त्यानंतर त्यांची लातूर च्या पोलीस अधीक्षकपदी म्हणून नियुक्ती झाली होती, (नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ) ठरलेल्या या धडाडीच्या अधिकाऱ्याची मे. 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या महिन्यांत पुन्हा त्यांची बदली महाराष्ट्र राज्य गृह विभागाने त्यांना पुणे शहरात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, मागील शुक्रवारी झालेल्या मोठ्या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, पुणेत नवीन पोलीस उपायुक्तांच्या नियुक्ती झाल्या असून, सोमय मुंडे यांच्यासह राजलक्ष्मी शिवणकर आणि ऋषिकेश रावले यांचा समावेश आहे,
