ऑपरेशन थंडर: नशेच्या अंधारावर जनजागृतीचा वज्राघात
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई नशा से दूर रहो भाई
प्रतिनिधी :सतीश कडू
नागपूर :हे केवळ एक घोषवाक्य नाही, तर समाजाला जोडणारा एक सुसंस्कृत संदेश आहे. नशा, ड्रग्स, दारू — यांना ना धर्म असतो ना जात. पण त्यांचा फटका संपूर्ण मानव जातीला व माणुसकीला बसतो. आणि म्हणूनच, नशेच्या अंधारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी नागपूर शहरात कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त माननीय डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे एक सशक्त मोहीम — *ऑपरेशन थंडर.*
ही मोहीम केवळ एका धर्माचे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे भान आहे. कारण नशा कोणत्याही धर्मात नाही — नशा फक्त अधर्म निर्माण करतो,कारण घडणारे असंख्य गुन्हे हे केवळ नशेच्या आहारी गेल्यातूनच घडताना दिसून येतात व त्याची पाळेमुळे ही सध्या समाजातील सर्व घटकात अल्पवयीन मुले शाळा कॉलेजमधील विद्यार्थी यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचले आहेत व त्याला जर वेळीच आळा घातला नाही तर जगात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या भारतातील तरुणाई हळूहळू निष्क्रिय होऊन, गुन्हेगारी वाढुन त्यातून होणारी अनाहूत हानी टाळणे कठीण होईल, हा दूरगामी विचार मनात ठेवून याच उदात्त हेतूने नागपूरचे कणखर व तितकेच संवेदनशील पोलीस आयुक्त डॉ श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी *ऑपरेशन थंडर* ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
*ही केवळ एक मोहीम नाही तर तो एक ध्यास आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून यात यशस्वी होण्यासाठी उचललेला शिवधनुष्य आहे.*
२६ जून — जागतिक अमली पदार्थविरोधी दिन
दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो
याच पार्श्वभूमीवर, नागपूर शहरात 20 जून ते 26 जून 2025 या कालावधीत ‘अँटी-ड्रग्स विशेष सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
या आठवड्यात संपूर्ण शहरामध्ये जनजागृती आणि कृती यांचे एकत्रित पर्व सुरू आहे.
यात नागपूर शहरातील सर्व 33 पोलीस ठाणे, गुन्हे शाखाची पथके, सायबर, ट्राफिक शाखा तसेच इतर सर्व शाखातील सर्व अधिकारी व अंमलदार अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जणू आपल्या घरातील एक मोठा उत्सव आहे असे समजून त्यात खारीचा वाटा उचलत आहे
उपक्रमांची रूपरेषा शाळा, कॉलेज ते चौकाचौकात जनजागृती
शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करून त्यात असंख्य शाळा कॉलेजमधील विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात आले आहे त्याचबरोबर
अनेक ज्येष्ठ नागरिक मंच, शांतता कमिटी, महिला दक्षता समिती, डॉक्टर्स, राजकीय नेते, सामाजिक संस्था यांचाही सहभाग होऊन त्यांचेही प्रेरणादायी मार्गदर्शन मिळत आहे
विविध संदेशात्मक पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया मोहिमा, नुक्कड नाटके, रील्स, यांचा वापर करून तरुणांमध्ये हृदय परिवर्तनशील असा थेट संवाद साधला जात आहे
सर्वत्र एकच संदेश –
जो करेगा नशा उसकी होगी दूरदशा
जब नशे का नाश होगा, तभी देश का विकास होगा
मोहिमेमार्फत शहरातील रिकाम्या, मोडकळीस आलेल्या इमारती, खंडर, आणि संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकून नशेचे अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात एमडी गांजा दारू यांची वाहतूक तस्करी व साठवणुकीचे अड्डे यांच्यावर धडक कारवाया करून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यात येत आहे
माननीय पोलीस आयुक्तांच्या मते पोलिसांचे काम फक्त गुन्हेगार पकडणे नव्हे, तर गुन्ह्यांची उगमस्थाने पाळे- मुळे उखडून टाकणे हेही आहे. आणि ती मुळे आज शाळा- कॉलेज या ठिकाणी पोचलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणणे, हेच या मोहिमेचे खरे ध्येय आहे.
पोलीस दल–केवळ रक्षक नव्हे,तर समाजप्रवर्तक
ही फक्त पोलीसांची मोहीम नसून, समाजासाठी दिलेला शपथबद्ध शब्द आहे.
माननीय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्या खंबीर आणि संवेदनशील नेतृत्वामुळे ही मोहीम केवळ नागपूरपुरती मर्यादित राहणार नाही, तर महाराष्ट्र आणि देशासाठी एक दिशादर्शक चळवळ ठरणार आहे.
संत कबीरांचा संदेश – नशामुक्तीचे शाश्वत तत्त्वज्ञान
अमल आहारी आत्मा,कब हो पावे पार
*कहे कबीर पुकार के, त्यागो ताही विचार
कबीरांनी स्पष्ट सांगितले आहे की — नशा करताना आत्मा शुद्ध होत नाही. जीवनाचा अर्थ हरवतो.
आजच्या तरुणांना हा संदेश पुन्हा ऐकवण्याची गरज आहे — *मनात जागृती, हातात संकल्प, आणि पावलांत नशामुक्त दिशेचा प्रवास असावा
ऑपरेशन थंडर
एक जनचळवळ,एक वटवृक्ष, एक सामाजिक शिव धनुष
ही मोहीम केवळ पोलीस दलापुरती मर्यादित नाही ही समाजाला एकत्र आणणारी दिशा देणारी आणि पुढे नेणारी एक सशक्त जन चळवळ आहे कारण पोलीस हे फक्त रक्षक नाहीत तर समाज प्रवर्तक सुद्धा आहेत माननीय पोलीस आयुक्त फक्त रवींद्र कुमार सिंगर यांच्या दूरदृष्टी आणि मानवतावादी दृष्टिकोनातून सुरू झालेली ही मोहीम केवळ नागपूर शहरापुरती व महाराष्ट्रापुरती नव्हे तर देशभरएक प्रेरणास्थान ठरेल. आणि केवळ उपक्रम नव्हे, ही एक जनचळवळ आहे. जी काळाच्या ओघात वटवृक्षासारखी विस्तारेल.
जे का रंजले गांजले
त्याशी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
या संत तुकारामांच्या ओळी पोलीस दलाच्या या संवेदनशील समाजभिमुख व उदात्त भूमिकेचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहेत चला तर मग
नशा नको, दिशा हवी
पोलिसांच्या पुढाकाराला नागरिकांची साथ हवी
आपण सर्वजण ऑपरेशन थंडर मध्ये सहभागी होऊया.
पोलिसांसोबत या मोहिमेत एकत्र उभे राहून,
तरुणांच्या हातात सिरिंज नव्हे, तर पेन असावं
ड्रग्स नव्हे,तर ड्रीम्स घडवूया
जय हिंद!
नशा मुक्त नागपूर – नशामुक्त भारत — समृद्ध भारत!
(विनायक गोल्हे )
पोलीस निरीक्षक
आर्थिक गुन्हे शाखा
नागपूर शहर
