पेरण्या झाल्या पूर्ण मात्र पाऊस काही येईना दुबार पेरण्याचे संकट..शेतकरी चिंतेत.
जालना जिल्हा प्रतिनिधी राजेश दामधर
यंदा पावसाळ्याच्या तोंडावर हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे भाकीत व्यक्त केले,परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात इतरत्र पाऊस बरसला देखील,यंदा पाऊस वेळेवरच पडणार या आशे वर भारज परीसारत शेतकऱ्यांनी मका, कपाशी,मिरची लागवड केली,मात्र पावसाने हुलकावणी दिली असल्याने दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
परिसरात जवळपास 50 टक्के मका लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी काही वेळ पाऊस पडल्याने मका लागवड यशस्वी झाल्याने शेतकरी आनंदात होते मात्र त्यांनतर पावसाने उघडीप दिल्याने मका पिकाला कोंब येऊन पावसाअभावी ते कोंब कोमेजून गेले असल्याने सर्वच शेतकऱ्यांना मका पिकाची पुन्हा लागवड करावी लागणार आहे.
यंदा मोजक्याच शेतकऱ्यांनी शेतात कपाशी पिकाची पेरणी केली अनेकांनी ठिबकच्या द्वारे पाण्याचे नियोजन केले,मात्र आता विहिरींची पाणी पातळी खोलवर गेल्याने पाण्याचे नियोजन होत नसल्याने केवळ सलाईनवर कपाशीचे पिके शेवटची घटका मोजत आहे
मिरची पिकाला पाणी पुरविताना होतेय धावपळ भारज परिसर मिरचीचे नंदनवन म्हणून संबोधल्या जाते,त्यातच मागच्या वर्षी हिरव्या तसेच लाल मिरचीला मोठ्या प्रमाणावर भाव मिळाल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर मिरची लागवड शेतकऱ्यांनी केली, मल्चिंग, तसेच बेडवर मिरची लागवड केली,यासाठी नर्सरीतील विकतचे रोपे आणली,जवळपास सर्वच शेतात मिरची लागवड झालेली आहे,मात्र पाऊस बरसला नसल्याने बहरलेली मिरची हातातून जायची शक्यता निर्माण झाली आहे,मिरचीला पाणी पुरविताना शेतकऱ्याची मोठी धावपळ होत आहे,त्यातच परिसरात कमालीचे तापमान वाढल्याने मिरची पिकाला जगविण्याचे शर्तीचे प्रयत्न बळीराजा करत आहे.अनेकजण आता टँकरचे विकतचे पाणी घेऊन मिरची पिकांना जगवत आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे,तर काहींना अजून पावसाची प्रतीक्षा आहेत एकुणच आता जर पाऊस वेळेवर आला नाही तर मोठे नुकसान होणार आहे.
