प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
अँटी करप्शन मानवाधिकार सर्वशक्ती
सेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
जळगाव : अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिंदवी स्वराज्य स्थापनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजाचा 351 वा दिव्यभव्य राज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजप राज्य सचिव प्रा. संजय मोरे होते.
विशेष प्रमुख अतिथी संभाजी नगरचे विवेक विचार मंच प्रांत संयोजक अरुण कराड अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया युवक राज्य उपाध्यक्ष प्रशांत जाधव होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला प्रा. संजय मोरे, अरुण कराड, डॉ. संदीप गाढे, प्रशांत जाधव यांनी पुष्पहार अर्पण केले.
त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारताला आपली मातृभूमी मानणारा प्रत्येक नागरिक छत्रपती शिवाजी महाराज्याचा हिंदवी स्वराज्याचा मावळा आहे. देशाला वैभवशाली समृद्ध करण्यासाठी शिवरायाचा प्रत्येक मावळा देशविघातक शक्तीविरुद्ध लढण्यास तयार झाला. भारत देशाला अखंड करण्याची प्रेरणा केवळ छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यातूनच मिळते. म्हणूनच नित्य राष्ट्र आराधना करताना हिंदू साम्राज्य दिनाचे भारताच्या प्रत्येक युवकाने व नागरिकांनी केले पाहिजे. आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार, विचार, राष्ट्रप्रेम, आत्मसात करावे. यातच देशाचे राज्याचे व स्व:ताहाचे कल्याण आहे, असे प्रा. संजय मोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सर्व शक्ती सेना राज्य उपाध्यक्षा माया मोरे, अँटी करप्शन राज्य उपाध्यक्ष विवेक बोडे, विवेक विचार मंच प्रांत संयोजक अरुण कराड, अँटी करप्शन राज्य उपाध्यक्ष प्रशांत जाधव, डॉ. महेंद्र सुरवाडे, डॉ. संदीप गाढे, डॉ. धनराज बावस्कर प्रा. सुनील तायडे, प्रा. योगिता सपकाळे, प्रा. अनिल सपकाळे, मानव अधिकार जिल्हाध्यक्ष बाळा शिरतुरे, मानव अधिकार युवक जिल्हाध्यक्ष सचिन सुरवाडे, सर्व शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष मयूर कोळी, प्रा. स्नेहा सोनवणे, विकास सावळे, रंजना सावळे, उमेश सावळे, शोभा कोळी, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते. डॉ. संदीप गाढे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धनराज बावस्कर यांनी आभार मानले.
