एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आठ लाखांची लाच मागणाऱ्या दिघी पोलीस ठाण्याच्या पीएसआय चैताली गपाट एसीबीच्या जाळ्यात

आठ लाखांची लाच मागणाऱ्या दिघी पोलीस ठाण्याच्या पीएसआय चैताली गपाट एसीबीच्या जाळ्यात; तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

पुणे, दि. १५ जुलै : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), पुणे परिक्षेत्राने केलेल्या सापळा कारवाईत दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) चैताली बाबासाहेब गपाट (वय ३५) यांना ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासात मदत करण्यासाठी तसेच भविष्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पीएसआय चैताली गपाट यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदार यांनी याबाबत १४ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र येथे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १५ जुलै २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान पीएसआय चैताली गपाट यांनी तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना सायंकाळी ५.४९ वाजता रंगेहात अटक केली.
या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन पाटील यांच्या नियंत्रणाखाली, पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link