अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनीधी विशाळ अडगळे पुणे
दत्तनगर, कात्रज गुजरवाडी रोड परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून या भागामध्ये सर्वसामान्य वर्गातील नागरिक वास्तव्यास असून या दत्तनगर परिसरातील नागरिकांना स्वतः हाताळत असलेले एलपीजी गॅस सारखे इक्विपमेंट कशा पद्धतीने सुरक्षित हाताळावे व यासाठी काय सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात तसेच एखादी गॅस गळतीमुळे दुर्घटना घडल्यास ती प्रथम दृष्ट्या कशा पद्धतीने हाताळावी व छोट्या दुर्घटने पासून होणारी मोठी दुर्घटना ही प्रथमदृष्ट्या कशी टाळावी व त्यानंतर अग्निशामक दल पोलीस प्रशासन अशा इमर्जन्सी सुविधांना कसा संपर्क साधावा याविषयी फायर अँड सेफ्टी, गॅस गळती एलपीजी कनेक्शन मध्ये वापरात असलेली उपकरणे कशी हाताळणे अशाच पद्धतीचे एलपीजी गॅस ग्राहक जनजागृती मोहीम ही वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी,
तसेच ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे मेंबर विशाल बाळासाहेब अडागळे तसेच शिवशंभु प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश भाई कदम व अखिल दत्त नगर मित्र मंडळ तसेच अग्निशामक दल भारती विद्यापीठ कात्रज विभाग STO विजय भिलारे सर, प्रदीप खेडेकर व अग्निशामक दल टीम, कांचन गॅस एजन्सी व उमा शिव भारत गॅस एजन्सी कात्रज यांच्या पुढाकाराने व सहकार्याने हा LPG गॅस गळती मुळे होणाऱ्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी या एलपीजी गॅस ग्राहक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व अशा पद्धतीचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा या परिसरामध्ये घ्यावा अशी मागणी महिला वर्गांकडून करण्यात आली. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी विशाल अडगळे पुणे
