श्री. रविंद्र पाटील (नाशिक जिल्हा प्रतिनिधी) ब्राह्मण समाजाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परशुराम भावनांचा उद्घाटन सोहळा नाशिक या ठिकाणी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. *काय म्हणाले देवेंद्र फडणवीस*? मी चित्तपावन ब्राह्मण संघाचा मनापासून अभिनंदन करतो की परशुराम भवन ही सुंदर वास्तु बांधली आणि त्याचे उद्घाटन करण्यासाठी मला संधी दिली त्यासाठी मी तुमच्या आभार मानतो. तुम्ही केवळ भवनच उभारले नाही तर हाॅस्टेलही उभारले आहे. यामध्ये ४० मुलांना राहण्याची व्यवस्था असेल. एनडीए किंवा तत्सम प्रोफेशनल परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन आणि मदत करण्याचा निर्णय जो घोषित झाला त्याबद्दल मी चित्तपावन संस्थेचे आभार मानतो. नाशिक या पुण्यनगरीत सकाळी आलो ते सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्या संदर्भात विविध पर्वणी यांच्या तारखांची घोषणा आज केली. त्यानंतर येथे आलो मला अतिशय आनंद आहे की ९३ वर्ष सातत्याने एखादी सामाजिक संघटना काम करते आहे. विविध प्रकल्प उभारत समाजाला एकत्र ठेवत समाजातील गरजूंना मदत करत पुढे जाते अशी उदाहरणं कमी दिसतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. चित्तपावन ब्राह्मण संघ नाशिक यांचा मी अहवाल पाहिला. त्यामध्ये १९३३ ला सभा झाली होती. त्याचे इतिवृत्त वाचायला मिळालं. न्यातीच्या संस्था यासाठीच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या चांगल्या लोकांचा एकत्रिकरण करता आलं पाहिजे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास बघितला तर समाजाचे कुठल्याही क्षेत्र काढून बघा त्यामध्ये आपल्याला अग्रणी चित्तपावन ब्राह्मण समाजाचे लोक पाहण्यास मिळतील. असेही ते म्हणाले. हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केले ते वाढवण्याचे काम असो, भारतीय स्वातंत्र्य लढा असो,समाजात सुधारणा करण्याचे काम असो, कला आणि साहित्य क्षेत्रात असो कुठल्याही क्षेत्र असो,कुठलंही क्षेत्र पाहिलं तर त्या क्षेत्रातली १० ठळक नाव काढली तर त्यातली किमान ३ ते ४ नावं चित्तपावन ब्राह्मण समाजाची पाहण्यास मिळतात.कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा आपला ब्राह्मण समाज आहे. असेही ते म्हणाले आहेत.या कार्यक्रमास समाजबांधव व नाशिकमधील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
