रविंद्र पाटील (नाशिक) : गेल्या पस्तीस वर्षांपेक्षा जास्त अध्यापन कार्य करणारे व समाजसेवेसाठी भरीव योगदान देणाऱ्या पाच शिक्षकांना ” शिक्षक जीवनगौरव पुरस्कार ” आणि पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांना ” दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्डस् ” ची घोषणा आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए आणि संदीप युनिव्हर्सिटीतर्फे करण्यात आली. त्यासोबत दहावी व बारावीच्या प्रत्येक क्लासमध्ये प्रथम आलेल्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस व स्मृतिचिन्ह देऊन ” प्रतिभा सन्मान २०२५ ” अंतर्गत गौरव करण्यात येणार आहे. रविवार ८ जुन रोजी २५ सकाळी दहा वाजता, गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या सोहळ्याला, जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉ संदीपजी झा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खाडवी उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व संदीप युनिव्हर्सिटीचे समन्वयक डॉ प्रमोद करोळे, डॉ विशाल सुलाखे यांनी दिली.*
जीवनगौरव पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये, कळवण येथील ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक दीपक शिवले, मखमलाबाद येथील नेहे कोचिंग क्लासेसचे दिनकर नेहे, मालेगाव स्टॅण्ड येथील यश क्लासेसचे पवन जोशी, सरगम म्युझिक अकॅडमीचे नंदकुमार देशपांडे, चांदोरी ता निफाड येथील शाह क्लासेसचे संचालक अमिन शाह यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मनमाडच्या सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे, देवळ्याच्या कदम क्लासेसचे स्वप्नील कदम, सिन्नरच्या मातोश्री क्लासेस ॲन्ड टेक्निकल हब चे संचालक प्रवीण गडाख, मालेगावच्या स्वप्नपूर्ती क्लासेसचे योगेश बोरसे, कॉलेज रोडच्या हेनरी सर इंग्लिश अकॅडमीचे सरदार हेनरी आणि कामटवाडेच्या गुरुकुल संस्कृत क्लासेसच्या वैशाली भोर यांना दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्डस् ने सन्मानित करण्यात येणार आहे.
