बीड स्थानिक गुन्हे शाखेची सुञे आता नेकनुरच्या ठाणेदार चंद्रकांत गोसावी यांच्याकडे जाणार
गोसावी साहेब चर्चेत
संभाजी पुरीगोसावी ( बीड जिल्हा ) प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर आता गुन्हे शाखेची सुञे कोणाकडे सोपविणार याबाबत चांगलीच चर्चा सूरू झाली आहे. यामध्ये अनेक अधिकारी इच्छुक असल्याचे चिञ पाहिलाय मिळत आहे. नेकनुर पोलीस ठाणेचे निरीक्षक चंद्रकांत गोसावी साहेब यांच्या नियुक्ती बाबत नागरिकात चर्चा आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकारयाच्या बदल्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हा पोलीस दलातील 664 अधिकार कर्मचारयाची बदली झाल्यानंतर आता जिल्ह्यात कालावधी पूर्णता झालेले पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक यांचीही बदली झाली असुन त्यांच्या जागी धाराशिव व इतर जिल्हयातील अधिकारयाची बीड जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी साहेब यांनी अनेक सवेदनशिल प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत.
