आशिष येरेकरांनी अमरावती जिल्हाधिकारी म्हणून विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्याकडून पदभार स्वीकारला
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची मुंबईला बदली
संभाजी पुरीगोसावी (अमरावती जिल्हा) प्रतिनिधी.
राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकाऱ्यांच्या दर्जेतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये जवळपास 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, अहिल्यानगरचे सीईओ म्हणून कार्यरत असणारे आशिष येरेकर यांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली होती, अखेर अमरावती जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी मावळते जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून नव्या पदस्थापने ठिकाणी रुजू झाले होते, यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी नूतन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्वागत करीत पदभार सोपविला, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी 23 जुलै 2022 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी पवनीत कोरे मॅडम यांच्या बदलीनंतर अमरावती जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता, जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम पाहताना ते नेहमीच जिल्ह्यात प्रयत्नशील राहिले, यावेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी अशी बोलताना अमरावती जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार अशा प्रतिक्रिया दिल्या,
