मैत्री करून पिंपरी -चिंचवड येथील व्यावसायिकाची 1कोटी 63 लाखाची फसवणूक.
प्रतिनिधी :संभाजी पुरी गोसावी पुणे
-पिंपरी -चिंचवड येथील जाधव इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा पोकलेन मशिन व हायवा ट्रक ही वाहने भाडेतत्वावर इतरांना भाड्याने देण्याचा व्यवसाय असून. दि. 15/02/2024 रोजी श्री. सचिन पाटील मो.क्र.यांचेशी मोबाईलवरून व्यवसाया संदर्भातुन ओळख झाली होती. त्यांनी त्यावेळी सांगितले होते की, ते सरकारी रोड कॉन्ट्रॅक्टर असुन त्यांची M/s Anuni Infrastructure नावाची कंपनी आहे. व त्यांचे साइट ऑफिस मु.पो. आटुळ. पाटण रोड, ता. कराड, जि. सातारा याठिकाणी आहे. मी माझ्या कंपनीच्या नावे राज्य शासनाच्या रस्त्याची कामे व माल वाहतूकीची कामे करीत असतो. तसेच माझी स्वतःची खान व क्रशर प्लांट आहे. मला कंपनीच्या कामाकरीता व माल वाहतूकीसाठी आपल्या कडील हायवा ट्रक व पोकलेन मशिन भाडयाने पाहिजे आहे असे सांगितले होते.
दि. 17/02/2024 रोजी जाधव इंडस्ट्रीजचे मालक यांचे सचिन पाटील याच्याशी मोबाईल फोनवरून बोलणे झाल्यानंतर ते त्यांना सातारा चौंक येथील प्रिती हॉटेल, सातारा याठिकाणी बोलाविलेवरून संध्याकाळी 08.00 वा. सुमारास भेटण्याकरीता गेले. सदर वेळी त्यांनी त्यांना त्यांचे M/s Anuni Infrastructure या कंपनीचे कामासाठी 5 हायवा ट्रक व 3 पोकलेन मशिन देण्याबाबत मागणी केली तसेच त्यांनी प्रती ट्रक साठी रक्कम रुपये 1,80,000/-रु. दर महिना भाडे व प्रती पोकलेन मशिनसाठी रक्कम 1,85,000/-रु दर महिना भाडे देण्याचे कबुल केले. त्यानंतर दि. 19/02/2024 रोजी त्यांनी त्याबाबत जाधव इंडस्ट्रीज वरील ईमेल आयडीवर त्यांचे ईमेल आयडीanuuniinfra@gmail.com यावरून वर्क ऑर्डर दिली. त्यामध्ये श्री. सचिन पाटील यांनी फक्त हायवा व पोकलेन मशिनचे भाडे वरीलप्रमाणे देणार असल्याचे नमुद केले व त्यासाठी ड्रायव्हर व ऑपरेटर ते स्वतः उपलब्ध करून देणार असल्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे दिनांक 21/02/2024 रोजी जाधव इंडस्ट्रीजने 5 हायवा ट्रक व 3 पोकलेन मशिन त्यांच्या स्वखर्चाने गु.पो. आढुळ पाटण रोड ता. कराड जि. सातारा या पत्त्यावर सचिन पाटील यांच्याकडे पाठविल्या. मशिन व हायवा पोहचले बाबत सचिन पाटील यांनी व्हाट्सॅपद्वारे रिसिव्ह मॅसेज केला होता हायवा ट्रक व पोकलेन मशिन सचिन पाटील यांना पाठविल्यानंतर त्यांनी 05 दिवसांनी तुमच्या ट्रक व पोकलेन मशिनसाठी ड्रायव्हर उपलब्ध होत नसून तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर मदत करा असे म्हटलेवर दि. 26/02/2021 रोजी जाधव इंडस्ट्रीजच्या मालकालच्या ओळखीने सचिन पाटील यांना 10 ड्रायव्हर 6 ऑपरेटर व 2 हेल्पर पाठवून देऊन सचिन पाटील यांना प्रति कामगार 22.000)/-रूपये पगार व 4000/-रूपये भत्ता असे एकूण एका कामगाराचे 26,000/-रुपये द्यावे लागतील असे सचिन पाटील यांना सांगितले व त्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली.
दि. 20/03/2024 रोजी सचिन पाटील यांनी त्यांच्या खाणीतील इतर कामगार लोकांचे व कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पेमेंट न दिल्यामुळे सर्व यंत्रणा बंद ठेवल्या म्हणून जाधव इंडस्ट्रीज ने त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी सध्या आर्थिक अडचणीत आहे. मला सध्या तुम्ही डीझेल व इतर खर्चासाठी मदत करा. मला शासनाचे जुलै महिण्याचे अखेरीस बिलाचे पैसे मिळतील त्यावेळी मी तुम्हाला बिलाची रक्कम व इतर रक्कम परत करीन असे सांगितल्यामुळे त्यांना काम बंद पडू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्या मागणीनुसार डीझेल व ब्लास्टिंग करिता एकुण 35.05.597/ रु. हे जाधव इंडस्ट्रीज कंपनीच्या जनता सहकारी बँक खाते क्रमांक 2301/3068 या खातेवरुन दिलेले आहेत. व ड्रायव्हर, ऑपरेटर, हेल्पर या कामगार लोकांचा एकूण 19,58,386/-रु. पगार हा जाधव इंडस्ट्रीजचे व्यवसायिक भागीदार नाव जॉर्ज विल्यम फ्रान्सिस रा. खराळवाडी, पिंपरी पुणे मो.क्र. 9822117179 यांच्या बँक खात्यावरून दिला आहे.
दि. 10/08/2024 रोजी जाधव इंडस्ट्रिज या कंपनीचे 5 हायवा ट्रकचे भाडे 51,92,069/- रु. व 3 पोकलेन मशिनचे भाडे 31,73,707/- रु., डीझेलसाठी दिलेले 35,055,97/-रु. व कामगारांचा पगार 19,58,386/- रु. व जीएसटी चे 24,89,357/- रुपये असे एकूण 1,63,19,115/- रूपये सचिन पाटील यांचेकडे येणे असल्याने त्यांचे M/s Anuni Infrastructure या कंपनीकडे बिले पाठवून पैशाची मागणी केली असता कंपनीचे मालक सचिन पाटील म्हणाले की, गेली दोन महिने कंपनीचे काम बंद आहे त्यामुळे मी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे बिलाची रक्कम देऊ शकत नाही. त्यानंतर सचिन पाटील यांचेकडे वारंवार बिलाच्या पैशाची मागणी केली परंतु त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देऊन पैसे देण्याचे टाळले तसेच सदर कामाची त्यांना शासनाकडून रक्कम देखील मिळालेली आहे. तरी सुध्दा त्यांनी अद्यापर्यंत रक्कम परत दिली नाही.
दि. 17/08/2024 रोजी सचिन पाटील यांचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी विनाकारण कामाचे बिलावरून वाद करून हायवा ट्रक व पोकलेन मशिन परत पाठवून दिल्या. त्यानंतर सचिन पाटील यांना मोबाईल फोनद्वारे वारंवार संपर्क केला असता ते फोन उचलत नसल्याने सचिन पाटील यांनी फसवणुक केली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सचिन पाटील यांच्याविरुध्द आर्थिक फसवणूक केल्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. सचिन पाटील यांच्या सोबत झालेल्या व्यवहाराचे कामाचे बिले, वर्क ऑर्डर, ईमेल, व्हॉट्सअॅप मॅसेज तसेच बँक स्टेटमेंट असे कागदपत्रे उपलब्ध असुन ते सादर केली आहेत.
तरी दि. 15/02/2024 ते दि. 17/08/2024 रोजीचे दरम्यान M/S ANUNI INFRASTRUCTURE चे संचालक नाव सचिन पाटील वय अंदाजे 50 वर्षे पत्ता अनुसया, स.नं. 78, कराड वाखन रोड, कराड अर्बन बँके समोर, कराड, जि. सातारा याने ते सरकारी रोड कॉन्ट्रॅक्टर असून त्यांचेकडे राज्य शासनाच्या रस्त्याची कामे आहेत. व त्यांची स्वतःची खाण व क्रशर प्लांट आहे असे सांगुन विश्वास संपादन करून त्यांच्या कंपनीच्या कामाकरीता जाधव इंडस्ट्रिज प्रा. लि. कंपनीची 5 हायवा ट्रक व 3 पोकलेन भाड्याने घेऊन त्यांच्या कंपनीच्या कामाकरीता वापरून त्यांचे बिल जमा होईपर्यंत मदत म्हणून डीझेल भरण्यासाठी व ड्रायव्हर आणि इतर कामगारांचे पगाराचे पैसे भरायला सांगितले. हायवा ट्रक व पोकलेन मशिनच्या बिलासोबत डीझेल भरण्यासाठी व ड्रायव्हर आणि इतर कामगारांचे पगारासाठी दिलेले पैसे एकरकमी देतो असे सांगुन हेतुपुरस्पर व जाणीवपूर्वक परत न देता विश्वास संपादन करून एकुण 1,63,19,115/- रूपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. म्हणून त्याचे विरुध्द जाधव इंडस्ट्रीज यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे
सांगितलेप्रमाणे टंकलिखित केलेला जबाब वाचून पाहीला तो बरोबर व खरा आहे. पुढील तपास पोनि भोजराज मिसाळ (गुन्हे) निगडी पो स्टे हे करीत आहेत.
