एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आगामी ईद उल अज़्हा २०२५ (बकरी ईद)निमित्त बैठक संपन्न

आगामी ईद उल अज़्हा २०२५ (बकरी ईद)निमित्त बैठक संपन्न

चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात आगामी ईद उल अज़्हा २०२५ (बकरी ईद)निमित्त चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन तर्फे शहर हद्दीतील सर्व मज्जित कमिटी पदाधिकारी मौलाना मुस्लिम प्रतिष्ठित, शांतता समिती सदस्य संबंधित शासकीय अधिकारी प्रतिनिधि यांची बैठक दिनांक 28 मे 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर परिसरात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

आगामी ईद उल अज़्हा (बकरी ईद) – २०२५ सणाच्या अनुषंगाने शासन प्रशासनाचे वतीने प्राप्त मार्गदर्शक सूचना तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा या दृष्टिकोनातून दिनांक २८.०५. २०२५ बुधवारी सायंकाळी 6 वा. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, हे मात्र विशेष!

या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे, सय्यद मजहर अली, शालिनी भगत, श्रीमती रेखा धनंजय दानव, मोरेश्वर खैरे, राजू राठोड, ताजुद्दीन शेख, सह मस्जिद कमेटी चे अफझल खान,अनवर मौलाना, मोहम्मद हबीबुर रहमान, मिर्जा सलीम बेग, मिर्ज़ा शकील बेग, इस्माइल पठान, युसूफ खान, कारी वकील साहब, सैयद महबूब, तस्लीम खान, शेख अनवर आलम, जहीरूद्दीन, जफर अहमद, मोहसिन खान, मोहम्मद इश्तियाक, सैयद इजहारूद्दीन, अल्ताफ शेख, सलाहुद्दीन काजी, मोहम्मद शकील अहमद, रमजान खान, इमरान खान, अब्दुल शदीद, जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष यूनुस कुरैशी, अयाज अली, सादिक खान, मोहम्मद रफी शेख, शेख रशीद, मोहम्मद रफीक, शेख हारून, हाजी मुबारक, आर. कुरेशी, तसेच डॉ. आनंद नेवारे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, डॉ. अमोल शेळके मनपा चंद्रपूर व महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश खडसे सह अनेक प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी या बैठकीत आगामी ईद उल अज़्हा निमित्त तीन दिवस साजरा होणाऱ्या या सणात चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने सलग तीन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा अशी विनंती करीत पठाणपुरा येथील दारुल उलूम मोहम्मदिया च्या परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कुर्बानी करण्यासाठी तात्पुरते स्लॉटर हाऊसची परवानगी मिळणार आहे व या स्लॉटर हाऊस मध्ये नियमांतर्गत बसणाऱ्या जनावरांची कुर्बानी करण्यात येईल व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समस्त मुस्लिम बांधवाकडून कोणाच्याही भावना दुखवण्यात येणार नाही अशी सर्व बांधवाकडून ग्वाही देत चंद्रपूर शहर मनपाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आवश्यक त्या सर्व सुविधा चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून उपलब्ध होणार असे विश्वास देखील या प्रसंगी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य प्रवीण खोबरागडे यांनी याप्रसंगी सांगितले की सध्या पावसाळ्या सारखेच दिवस सुरू आहे व या सणानिमित्त महावितरणाच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही अशी सूचना करण्यात आली

 

तदनंतर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी सांगितले की आपण सर्व मिळून हा सण गुण्यागोविंदाने साजरा करूया! शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सुद्धा तंतोतंत पालन होईल असे मला विश्वास आहे, व चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे सांगत आपणास काही असुविधा निर्माण होत असेल तर आमच्यापर्यंत किंवा संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी. सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे किंवा काही आपत्तीजनक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर त्याची तक्रार करावी असे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले.

या बैठकीला ए.पी.आय.राहुल ठेंगणे विशेष शाखेचे सुजित बंडीवार, ही उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link