संभाजी पुरीगोसावी : आनंद भंडारी यांनी अहिल्यानगर चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला, तर आशिष येरेकरांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती..!! अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख विभाग पुणे येथील अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची वर्णी अहिल्यानगरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली असून त्यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला आहे, तर मावळते सीईओ आशिष येरेकरांना पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे, साधारण सव्वातीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर 2018 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आशिष येरेकर यांची बदली झाली होती, तेव्हापासून येरेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांच्या काळात केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेत हजारो कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली होती, विशेष म्हणजे येरेकर यांना सलग तीन वर्षापासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेवर एक हाती काम करण्याची संधी मिळाली होती, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून येरेकरांच्या बदलीचा आदेश निघणार याबाबत चांगलीच चर्चा होती, अखेर आशिष येरेकरांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
