सतिश कडु नागपूर, दि. 28 मे, 2025: – स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, प्रभावी वक्ता व कवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांना महावितरणतर्फ़े विनम्र अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन केले. यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुला राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) विवेक बामनोटे यांच्यासह महावितरण व महानिर्मीतीचे अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
फ़ोटो ओळ – स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी.
