एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

पुणे, दि. २७: पुणे जिल्ह्यातील मयत सौ. वैष्णवी हगवणे यांची जाऊ सौ. मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि श्रीमती लता जगताप यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७ नोव्हेंबर २०२४ रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन १९ मे २०२५ रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे श्रीमती मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही.

पौंड पोलिसांनी गुन्हा रजि नं. ४८५/२०२४ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ७४,११५,३५२,२९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने ३१ जानेवारी २०२५ रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. श्रीमती मयुरी जगताप यांच्या प्रकरणी २२ मे २०२५ रोजी १०२/२०२५ अन्वये मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link