मधु तारा थेट
संपादकीय
हॉस्पिटल मध्ये जाऊन दिव्यांग सिकंदर भाई यांना व्हीलचेअर मोफत भेट.
दिनांक. 22 मे 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे आपल्या उदरनिर्वाह साठी काम करत असताना 30 फूट वरून खाली पडून जखमी झालेल्या आणि मणके पूर्ण पणे निकामी झालेल्या श्री सिकंदर भाई पठाण राहणार पिंपरी चिंचवड यांना मोफत व्हीलचेअर हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट दिली.*
*ही व्हीलचेअर पुणे बी.टी.कवडे रोड येथील राहणाऱ्या श्रीमती आशाताई यांनी आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ मधु ताराला यांच्या निःस्वार्थ कार्याला बघून गरीब रुग्ण दिग्यांग यांना भेट म्हणून दिली.*
*संत तुकाराम नगर पिंपरी येथील डी वाय पाटील हॉस्पिटल समोर छोटा हॉटेल व्यवसाय चालवणाऱ्या श्री हसनभाई मुलाणी यांनी 86 टक्के दिव्यांग असलेल्या मधु तारा सोबती वासंतीताई यांना गरजू रुग्ण श्री सिकंदरभाई यांना व्हीलचेअर हवी अशी माहिती दिली.वासंती ताई यांनी लगेच मधु ताराशी संपर्क केला.
*या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी नेहमी प्रमाणे राज्यभर स्वतःजाऊन दिव्यांगाना मदतीचा हात देतात तसंच हॉस्पिटल मध्ये स्वतः जाऊन व्हीलचेअर स्वखर्चाने आणून दिली.*
*या प्रसंगी मधु तारा प्रमुखांनी स्वतःव्हीलचेअर थेट त्यांच्या पर्यंत आणून दिल्या बद्दल श्री सिकंदरभाई पठाण यांना अश्रू अनावर झाले. श्री सिकंदर भाई व त्यांच्या मातोश्रीनी मधु तारा प्रमुखांचे आभार मानत अनेक आशीर्वाद दिले.व आशाताई यांनी व्हीलचेअर साठी सहकार्य केल्या बद्दल अनेक आभार व्यक्त फोन द्वारे केले.या वेळी आशाताई यांनी दुआ मे याद करो असे म्हणत खऱ्या गरजू पर्यंत व्हीलचेअर पोहचल्याच समाधान व्यक्त केले.*
*या वेळी मधु तारा प्रमुखांनी करता करविता परमेश्वर आहे आपण फक्त निम्मित आहोत असे म्हटले.*
*मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी.*
