अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
भटवाडी घाटकोपरमध्ये मिनी नाट्यगृहासाठी श्री विकास वायाळ यांची महत्वपूर्ण मागणी
घाटकोपर (भटवाडी), येथील कलाप्रेमी तरुणांना व स्थानिक कलाकारांना आपले कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक श्री विकास वायाळ यांनी पुढाकार घेतला आहे.
यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेविका सौ. अश्विनी दीपक हांडे, कार्यसम्राट आमदार श्री राम कदम साहेब आणि कार्यसम्राट खासदार श्री संजय दिना पाटील साहेब यांना भटवाडी घाटकोपर परिसरात ७५ ते १०० आसन क्षमतेचे मिनी नाट्यगृह आपल्या विकास निधीतून बांधून देण्याची विनंती केली आहे.
श्री वायाळ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
सदर मिनी थेटर नाट्यगृहाचा फायदा हा महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील मुंबईत येणाऱ्या कलाक्षेत्र संबंधित सर्वांना होईल व त्यानिमित्ताने अनेक रोजगार उपलब्ध होतील
“भटवाडी, घाटकोपर परिसरात अनेक होतकरू कलाकार, नाट्य व सांस्कृतिक संस्था कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कला सादरीकरणासाठी सुसज्ज व योग्य जागेचा अभाव आहे. हे मिनी नाट्यगृह स्थानिक कला-संस्कृतीला चालना देण्यासोबतच, तरुण पिढीला सकारात्मक वळण देईल.”
या नाट्यगृहात स्थानिक कार्यक्रम, वर्कशॉप, लघुपट प्रोजेक्शन, सामाजिक उपक्रम, महिला व युवांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा, तसेच चित्रपट व रंगभूमीच्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातील.
“ही मागणी केवळ एक वास्तू उभी करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती घाटकोपर परिसरातील सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे,” असे श्री वायाळ यांनी स्पष्ट केले.
