अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
बौद्ध पौर्णिमा निमित्त धम्मविनय मॉनेट्री केंद्राला इंजिनीयर पांडुरंग शेलार यांची भेट,
बौद्ध पौर्णिमा निमित्त खडकवासला धरणाच्या मै.आगळांवे येथे मॉनेट्री केंद्र बांधण्यात आले आहे त्याचे उद्घाटन मेडिडेशनचे प्रशिक्षक प्रसिद्ध बौद्ध अभ्यासक भंते आर्य वांगासो गुरुजी यांच्या हस्ते सांची टाईप स्तूपाचे करण्यात आले, यावेळी वांगसो गुरुजी यांनी धम्म प्रवचन दिले.
यावेळी सुमारे 2000 बौद्ध बंधू भगिनींनी या पवित्र स्थानाला भेट दिली महाराष्ट्रातील व प्रामुख्याने पुणे शहरातील बौद्धांसाठी हे एक भव्य व आदर्श निसर्गरम्य केंद्र मेडीटेशन साठी खुले झाले आहे अशी प्रतिक्रिया या सेंटरला भेट दिल्यानंतर पांडुरंग शेलार यांनी व्यक्त केली, डाव्या बाजूला धम्म विनय मॉनेट्री तर्फे आयोजित विशाखा पूजा तसेच सांची टाईप स्तूपाचे कार्यक्रमास माजी कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागचे इंजि. पांडुरंग शेलार
सपत्नीक भेट दिली,
