अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : किशोर गुडेकर“ छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील धुळीच्या प्रश्नाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून ही समस्या लक्षात घ्यावी”, अशी विनंती नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्देश जी कदम यांच्या कडे मा.आमदार / शिवसेना नेते व अध्यक्ष : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली होती.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सध्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. मैदानातील मातीचे धुळीकरण हवेतून उडून जवळच रहात असलेल्या नागरिकांच्या घरात जात आहे. तसेच श्वासावाटे ही धूळ नाका तोंडात जाऊन अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. जेष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी येथे येत असतात. परंतू मैदानातील धुळीच्या त्रासामुळे ते त्रस्त झालेले होते. त्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले होते.
या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी पार्क मैदानाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम, महापालिकेचे अधिकारी, मा.आमदार सदा सरवणकर, मा.नगरसेवक समाधान सरवणकर , शिवाजीपार्क नागरिक संघ चे प्रकाश बेलवडे , रवी मेनकुरकर व इतर सहकारी उपस्तिथ होते व संयुक्त भेट दिली आणि येथील धुळीमुळे आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या त्रासाची पाहणी केली. तसेच या भेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या देखील जाणून घेतल्या व येत्या पंधरा दिवसात महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेत कार्यवाहीला सुरुवात करावी असे निर्देश उपस्थित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
