एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले यांचे विनंती नुसार माननीय महापौर रवी लांडगे यांची सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी!

राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले यांचे विनंती नुसार माननीय महापौर रवी लांडगे यांची सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळणार स्वानुग्रह अनुदान !

पिंपरी (प्रतिनिधी) नवनाथ वाकडकर

दिनांक ६ नोव्हेंबर २०२६:- कामगार नेते यशवंत भाऊ भोसले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्यामध्ये आज (दि.६) सकाळी ११ वाजता महापौर कार्यालयामध्ये कामगारांच्या दिवाळी बोनस आणि वेतना संदर्भात बैठक पार पडली. सानुग्रह अनुदानाबाबत आर्थिक गणित तपासण्याचे मुख्य लेखापरीक्षकांना निर्देश दिले असून महापौर यांनी लेखा विभागाचा अभिप्राय आज दुपारपर्यंत सादर करण्यास सांगितले असून त्यानुसार सायंकाळी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करणार असल्याचे महापौर यांनी पत्रकारांना आज सकाळी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मागणीबाबत महापौरांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा, तसेच कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली होती.

महापौर रवी लांडगे म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या बोनसचा विषय कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या माध्यमातून आमच्यासमोर आला होता. यशवंतभाऊ हे अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत असून, कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लागला आहे. काही कामगारांच्या मासिक वेतनामध्ये वाढ करून त्यातून बोनसच्या स्वरूपात वर्षाला जवळपास १८ ते १९ हजार रुपये मिळाले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर विभागांमध्ये मिळून जवळपास दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कामगार मनापासून मेहनत घेतात. त्यांच्या कष्टांमुळेच महापालिकेला शहरातील नागरिकांना विविध सेवा व्यवस्थितपणे देता येतात. त्यांच्या योगदानाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

या कामगारांना दिवाळीनिमित्त जास्तीत जास्त किती सानुग्रह अनुदान देता येईल, याचे आर्थिक गणित मांडण्यास मुख्य लेखापरीक्षकांना सांगण्यात आले आहे. संपूर्ण हिशेब समोर आल्यानंतरच अनुदानाच्या रकमेबाबत निश्चितपणे सांगता येईल. मात्र, कंत्राटी कामगारांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी महापालिका निश्चितच सकारात्मक प्रयत्न करेल, असे आश्वासन महापौर रवी लांडगे यांनी दिले.

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, शहरातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या महापौर रवी लांडगे साहेबांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच संवेदनशीलता दाखवली आहे. यापूर्वी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली; मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत अशा प्रकारची सहानुभूती व्यक्त होताना दिसली नव्हती. त्यामुळे सध्याच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करायला हवे.काही कंत्राटदार कामगारांच्या वेतनाच्या स्लिपमध्ये बोनसचा स्वतंत्र हेड दाखवत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्या कंत्राटदारांकडून बोनसच्या हेडखाली रक्कम दिली जात नाही, त्यांच्याकडील कामगारांना नियमानुसार बोनस मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक कंत्राटी कामगाराला प्रत्यक्षात बोनस मिळाला आहे की नाही, याची खातरजमा होणे गरजेचे आहे.कंत्राटी कामगार हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अनेकदा अधिक कष्टाचे काम करतात. शहर स्वच्छ ठेवण्यापासून आरोग्य, सुरक्षा आणि विविध अत्यावश्यक सेवांपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हे कामगार पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा विचार करून त्यांना दिवाळीच्या निमित्ताने किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

महापौरांनी संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आर्थिक गणित स्पष्ट झाल्यानंतर कंत्राटी कामगारांना किती सानुग्रह अनुदान मिळणार, याकडे संपूर्ण शहरातील कामगारांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौरांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत कंत्राटी कामगारांना किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link