एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बारामतीत गोळीबार आणि कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामतीत गोळीबार आणि कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी मच्छिंद्र करे | बारामती

पालखी महामार्गावरील पायलट ढाब्याजवळील घटना; स्कुटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांचा हल्ला
बारामती, दि. २१ ऑक्टोबर : बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर विमानतळ रेल्वे ब्रिजच्या पुढे कटफळच्या दिशेने पायलट ढाब्याजवळ एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी आणि राणा दिलीप सूर्यवंशी हे पालखी महामार्गावरील विमानतळ रेल्वे ब्रिजच्या पुढे पायलट ढाब्याजवळ उभे होते. त्यावेळी कटफळच्या बाजूने स्कुटीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले.
त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने अंगात जॅकेट आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्याने राणा दिलीप सूर्यवंशी यांना बुके देण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच लोखंडी सत्तूरने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर वार केले. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला आणि पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर संबंधित दोन्ही अनोळखी इसमांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२), ३(५) तसेच आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दाखल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक भगत यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

— प्रतिनिधी मच्छिंद्र करे, बारामती

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link