एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कुरखेड्यात खळबळ

ब्रेकिंग न्यूज | कुरखेड्यात खळबळ!

प्रतिनिधी मनोज उराडे


२१.७० कोटींच्या कथित अनियमिततेवरून १९ ग्रामपंचायतींचे सरपंच-ग्रामसेवक रडारवर?
नोटिसांना उत्तर देण्याआधीच उपोषणाचे हत्यार; पंचायत समितीच्या आवारातील आंदोलनावर प्रशासनाची नाराजी!
गडचिरोली कुरखेडा (प्रतिंनिधी मनोज उराडे) : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांमध्ये तब्बल ₹२१ कोटी ७० लाख २५ हजार १८६ रुपयांच्या अनियमिततेचा मुद्दा समोर आल्याने प्रशासनासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांना लेखी खुलासा सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे.मात्र, नोटिसांना उत्तर देण्याऐवजी आजी-माजी सरपंचांनी थेट उपोषणाचा मार्ग का स्वीकारला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.
४ सप्टेंबर २०२६ पासून पंचायत समितीच्या आवारात सुरू असलेल्या उपोषणामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा व वाहन पार्किंगला अडथळा निर्माण होत असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदार कुरखेडा व पोलिसांना कळविले आहे. तसेच उपोषणाचे ठिकाण पंचायत समितीच्या आवाराबाहेर हलविण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांकडून लेखी जबाब मागविला आहे. त्यामुळे कथित आर्थिक अनियमिततेबाबत कागदोपत्री स्पष्टीकरण देण्याऐवजी आंदोलनाचा मार्ग का निवडला गेला? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामविकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी नियमांनुसार व पारदर्शकपणे खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळे १९ ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र व निष्पक्ष तपासणी करून प्रत्येक रुपयाचा हिशेब तपासला जाणे गरजेचे आहे. उपोषणामुळे मूळ आर्थिक प्रश्न झाकला जाणार का? की प्रशासन कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार? कुरखेड्यातील या आंदोलनामागचे खरे कारण काय आणि २१.७० कोटींच्या कथित अनियमिततेचा अंतिम हिशेब कधी लागणार? या प्रश्नांची उत्तरे आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link