शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मंगेश चिवटे यांना विधान परिषदेत पाठवा
*उद्योगमंत्री उदय सामंत यांचा व्हिडिओ कॉलद्वारे ठाम पाठिंबा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचेही आवाहन*
*‘धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच योजने’च्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद*
*कोल्हापूर, प्रतिनिधी :* शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी मंगेश चिवटे यांना विधान परिषदेत पाठवा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित शिक्षक मेळावा आणि पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रभावी संवाद साधत मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली आहे. शिक्षकांना वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिलाच्या रिअम्बर्समेंटसाठी विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. आधीच आजारपणाच्या मानसिक व आर्थिक तणावात असलेल्या शिक्षकांना या कागदोपत्री प्रक्रियेचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्यातील शिक्षकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच योजना’ लागू करण्यात यावी, अशी संकल्पना मंगेश चिवटे यांनी मांडली.
या संकल्पनेचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कौतुक केले. या विषयासंदर्भात बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत, लवकरच या योजनेबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
याचवेळी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंगेश चिवटे हेच योग्य उमेदवार आणि भावी आमदार असल्याचे गौरवोद्गार आबिटकर यांनी काढले. “आम्ही सर्वजण मंगेश चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा व्हिडिओ कॉलद्वारे ठाम पाठिंबा
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमाशी संपर्क साधत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
“मंगेश चिवटे यांच्या पाठीशी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने काम करतील आणि आगामी निवडणुकीत ते नक्कीच विजयी होतील, यात कोणतीही शंका नाही,” असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
उद्योगमंत्र्यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे व्यक्त केलेल्या या पाठिंब्यामुळे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला राज्यस्तरीय नेतृत्वाचा आणखी एक महत्त्वपूर्ण राजकीय आधार मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.
“मंगेश चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत” — राजेश क्षीरसागर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा व्यक्त केला. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कामाला सुरुवात केली असून, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार निवेदिता माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आपल्या शिक्षण संस्थांच्या वतीने मंगेश चिवटे यांना पाठिंबा जाहीर केला. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी चिवटे यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता ते मोठ्या ताकदीने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“संपूर्ण ताकदीनिशी मंगेश चिवटे यांच्या पाठीशी” — आमदार चंद्रदीप नरके
आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगेश चिवटे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक व शिक्षकहिताच्या कामाचे कौतुक केले. शिक्षकांसाठीही ते याच तळमळीने आणि ताकदीने काम करतील, असा विश्वास व्यक्त करत, मंगेश चिवटे यांना निवडून आणण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
“शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंगेश चिवटे हेच सक्षम उमेदवार”
माजी आमदार सुजित मिणचेकर यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे आणि ते प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणारे नेतृत्व म्हणून मंगेश चिवटे हेच सक्षम आमदारकीचे उमेदवार असल्याचे सांगितले.
शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी
‘धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच योजना’ ही केवळ एका योजनेची मागणी नसून राज्यातील हजारो शिक्षकांना वैद्यकीय उपचारानंतरच्या कागदोपत्री प्रक्रियेच्या त्रासातून दिलासा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. शिक्षकांना उपचार मिळाल्यानंतर मेडिकल बिलाच्या परताव्यासाठी कार्यालयीन प्रक्रियेत वेळ आणि ऊर्जा खर्च करावी लागू नये, हा या संकल्पनेमागील प्रमुख उद्देश आहे.
त्यामुळे शिक्षकांचे आरोग्य, वैद्यकीय सुविधा, सेवा-सुविधा आणि हक्काचे प्रश्न हे आगामी शिक्षक आमदार निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
शिक्षकांचे प्रश्न जाणून घेणारे, त्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे आणि शिक्षकांना प्रत्यक्ष दिलासा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे नेतृत्व विधान परिषदेत असावे, या भूमिकेतून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला राजकीय तसेच शिक्षक क्षेत्रातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.
शिक्षक, शिक्षण संस्था प्रतिनिधींचा विजयी निर्धार
दरम्यान, उपस्थित शिक्षक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी व शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी मंगेश चिवटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा व्हिडिओ कॉलद्वारे व्यक्त झालेला ठाम पाठिंबा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, राजेश क्षीरसागर, खासदार निवेदिता माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वास यामुळे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला राजकीय आणि सामाजिक पातळीवर व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ, कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख विजय बलगुडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जिल्हा समन्वयक विनायक साळोखे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हाप्रमुख मनमोहन खोत, महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई, शहरप्रमुख विनायक जाधव, प्रशांत पाटील, अतुल साळोखे, नवनाथ खोत, फरीन मकुभाई, अक्षय साखरे, सचिन डोंगरे, रोहिणी सांबरेकर, संतोष पाटील, महेश धनवडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








