एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दीपराज इलमकार यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड; माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीतर्फे सक्षम आणि सक्रिय नेतृत्वाला राज्याची जबाबदारी;

दीपराज इलमकार यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड;
माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीतर्फे सक्षम आणि सक्रिय नेतृत्वाला राज्याची जबाबदारी;

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

भंडारा (प्रतिनिधी) : माहितीचा अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा देणारे दीपराजजी इलमकार यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपराजजी इलमकार यांचे राज्यभर प्रशासनिक, सचिवालय, स्थानिक प्रशासन, विभागीय प्रशासन असे सर्वच स्तरावर सामाजिक भावनेतून कार्य कायस्वरूपी सुरु असते. त्यांची सामाजिक जाणीव ही कायम तळमळीची आणि प्रत्येकाला सहकार्याची असते, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला वेळोवेळी मदत व्हावी, प्रसंगी स्वतःच्या खिशातून खर्च करून मदत करण्याची देखील भूमिका घेण्यास त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलेले नाही, मग अगदी कामाची झेप मंत्रालयापर्यंत का असेना, कायम समाजहिताच्या भावनेतून कार्य करत राहणे हीच भावना त्यांची असते. मागील तीन वर्षे समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता, जनतेच्या समस्या, शासकीय योजनांची योग्य अशी अंमलबजावणी, नागरिकांचे हक्क यासाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत समितीच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर राज्यस्तरीय उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करत ‘प्रशासनात पारदर्शकता आणि जनतेला न्याय’ या उद्देशाने दीपराज इलमकार यांनी ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडल्या आहेत. विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करताना संबंधित यंत्रणांनी आपल्या कार्याप्रती उत्तरदायी राहावे, यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपराज इलमकार यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे भंडारासह संपूर्ण महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक संघटितपणे मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link