फुरसुंगी खंडणी प्रकरणाचा थरारक तपास; बिश्नोई टोळीतील आरोपींना पंजाब, राजस्थान, हरियाणातून ताब्यात
पुणे प्रतिनिधी महालिंग स्वामी
तीन अग्निशस्त्रे, तीन मॅक्झिन व ४० जिवंत काडतुसे जप्त; उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान
पुणे : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गंभीर प्रकरणाचा पुणे शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत छडा लावला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम राबवून बिश्नोई टोळीशी संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींकडून तीन अग्निशस्त्रे, तीन मॅक्झिन आणि ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे फुरसुंगी परिसरातील गोळीबार व खंडणी प्रकरणाचा महत्त्वपूर्ण उलगडा झाला असून, पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुन्ह्याचा तपास करताना विविध राज्यांमध्ये धाडसीपणे शोधमोहीम राबवून आरोपींपर्यंत पोहोचणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठा, उत्कृष्ट तपास कौशल्य आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, क्राईम ब्रँच चे भरत गुडवाड यांचे विशेष अभिनंदन! करण्यात आलेले आहे








