शिवाजी विद्यालय सिडकोच्या शिक्षकाची मान्यता शिक्षण उपसंचालक नी रद्द केली.* आता महेश हवाच्या मान्यतेकडे लक्ष.
सखाराम कुलकर्णी
नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथील शिक्षक संतोष पुंडे यांच्या नियुक्तीच्या मान्यतेचे आदेश शिक्षण विभागात दिसून येत नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक लातूर दीपक चवणे यांनी ही मान्यता रद्द करून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी जाधव यांना दणका दिला.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथे संतोष विठ्ठलराव पुंडे यांची तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दि.१९-०७-२०१९ ला सहशिक्षक पदी नियुक्ती केली होती. सदर नियुक्ती पवित्र पोर्टल सुरू झाल्यावर केली होती. शालार्थ प्रणालीत नाव प्रविष्ट करण्यास संतोष पुंडे यांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचेकडे अर्ज केल्यावर सदरील प्रकरण शिक्षण उप संचालक लातूर यांचे कडे मंजुरीस गेले .तेथे दि०७-०४-२०२६ रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प नांदेड यांनी सत्य परिस्थिती सांगून ही नियुक्तीस मंजुरी शिक्षण विभागाने दिली नाही. या नियुक्ती आदेशाचा आवक- जावक मध्ये नोंदी जुळत नाहीत. असे म्हणणे मांडले व संतोष पुंडे तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांचे म्हणणे ऐकून कोणाच्याही प्रलोभनाला व दबावाला बळी न पडता शिक्षण उपसंचालक लातूर दीपक चवणे यांनी सदरील मान्यता रद्द चे आदेश पारित केलेत. याच संस्थेत शिवाजी जाधव यांनी नियमबाह्य नियुक्त केलेले सतरा प्राध्यापक तत्कालीन शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती यांनी दि.१७-०२-२०२६ रोजी रद्द केलेत. आता याच विद्यालयातील शिपाई महेश हवा यांच्या शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट होण्यास दि.०४-८-२०२६ ला शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्याकडे सुनावणी झाली .महेश हवाच्या नियुक्ती आदेशात फारच गंभीर बनावट बाबी असून तत्कालीन मुख्याध्यापकांनी लेखी दिले की महेश हवाची नियुक्ती केलेलीच नाही .तत्कालीन मुख्याध्यापक , तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्यावर नियुक्ती आदेश असल्याचे दिसत आहेत. या प्रकरणावर शिक्षण उपसंचालक लातूर काय निर्णय देतात नियुक्ती रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देतात का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजी जाधव यांनी नियमबाह्य केलेल्या एक एक नियुक्त्या रद्द होत असल्यामुळे शिक्षण विभागाच्या सत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








