एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित

उप संपादक | प्रणित काठोके

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारकडे याबाबत खुलासा मागितला.
आमदार एकनाथराव खडसे यांनी महिला व बालविकास मंत्र्यांना विचारलेल्या तारांकित प्रश्नामध्ये राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीसांना गेल्या काही महिन्यांपासून मानधनाच्या वितरणात झालेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७,८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे दोन महिन्यांचे मानधन प्रलंबित असल्याच्या बाबीकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी SNA SPARSH या नव्या कार्यपद्धतीद्वारे निधी वितरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही काळ मानधन वितरणात विलंब झाला होता.
मात्र, आवश्यक कार्यवाही पूर्ण करून डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीतील केंद्राचा हिस्सा तसेच त्यासमवेत राज्य शासनाचा हिस्सा अदा करण्यात आला असून, राज्य शासनाकडून देय असलेले अतिरिक्त मानधन नियमितपणे वितरित करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वेळेवर मानधन मिळावे, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेत केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link