एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; नंदुरबार अंगणवाडी पोषण आहार घोटाळ्यात दोघांवर कारवाई

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; नंदुरबार अंगणवाडी पोषण आहार घोटाळ्यात दोघांवर कारवाई

उप संपादक | प्रणित काठोके

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी पूरक पोषण आहार योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाला महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर देत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ दरम्यान अंगणवाडी केंद्रातील बालकांना पूरक पोषण आहार पुरविण्याच्या नावाखाली बचत गटांच्या नावाने बनावट देयके तयार करून तसेच अनधिकृत विक्रेता नोंदणी (Vendor Registration) करून ₹१२,०५,६५६ इतक्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद, नंदुरबारच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ जानेवारी २०२६ रोजी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालात बालविकास प्रकल्प कार्यालय, तळोदा आणि नंदुरबार येथील दोन कनिष्ठ सहाय्यक कर्मचारी अपहारासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपहारातील काही रक्कम शासनाकडे वसूल करून जमा करण्यात आल्याची माहितीही उत्तरात देण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, हा प्रश्न विधानसभेत आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला होता. त्यांनी अंगणवाडी पूरक पोषण आहार योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि अपहाराची रक्कम वसूल करण्याबाबत शासनाकडे खुलासा मागितला होता. शासनाने चौकशी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे उत्तरात स्पष्ट केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link