एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत किनगाव-वरणगाव ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न लावला; रिक्त पदे भरण्याची सरकारकडे जोरदार मागणी

आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत किनगाव-वरणगाव ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न लावला; रिक्त पदे भरण्याची सरकारकडे जोरदार मागणी

उप संपादक | प्रणित काठोके

जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) व वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमधील रिक्त पदे, अपुरी आरोग्य सेवा आणि रुग्णालयांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
आमदार खडसे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांना विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नामध्ये किनगाव ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याची बाब मांडली. तसेच वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना सरकारने किनगाव ग्रामीण रुग्णालयासाठी १० नियमित पदे मंजूर असल्याचे सांगितले. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांनी इतर संस्थांमधून वैद्यकीय अधीक्षक, अधिपरिचारिका आणि गट-ड कर्मचाऱ्यांची तात्पुरती वर्गणी केली असल्याची माहिती दिली.
तर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात गट-अ ते गट-डची एकूण २८ पदे मंजूर असून त्यापैकी १५ पदे भरलेली असल्याचे सरकारने स्पष्ट केले. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे रुग्णसेवा सुरू असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले.
याशिवाय, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १,४४० रिक्त पदांसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारने विधानसभेत सांगितले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी किनगाव व वरणगाव ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरून नागरिकांना दर्जेदार आणि अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच अधिक सक्षम आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link