धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
धरशीव जिल्हा प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार खा. ओमराजे निंबाळकर यांनी 7 लाख 48 हजार 752 मते मिळवत विजय संपादन केला होता. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते मिळाली होती.
या निवडणुकीत खा. ओमराजे निंबाळकर यांनी 3 लाख 29 हजार 846 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
मात्र आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, खा. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडू शकतात आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) प्रवेश करू शकतात.
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
जर हा राजकीय बदल झाला, तर धाराशिवच्या राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींबाबत तुमचे मत काय?
खा. ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर करावे का? की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहावे?
#OmrajeNimbalkar #UddhavThackeray #EknathShinde #ऑपरेशन_टायगर #धाराशिव








